Pandharpur News: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून कोण उमेदवार असणार याबाबत भाजपमध्ये अद्याप निर्णय झालेला नाही. विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात सुरू असलेल्या अंतर्गत वादामुळे तिढा कायम आहे. चंद्रकांत पाटील यांनी हा वाद आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'कोर्टात' असल्याचे सांगितले. पश्चिम महाराष्ट्रात माढा लोकसभा मतदारसंघ हा महत्वाचा मतदारसंघ आहे.
माढ्यात उमेदवारीवरून निर्माण झालेला देवेंद्र फडणवीस हे सोडवतील. उमेदवारांचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. त्यामुळे मोहिते पाटलांची काही प्रमाणात नाराजी असेल तर त्यावरही पक्षातील प्रमुख नेते एकत्रीत बसून मार्ग काढतील, असे चंद्रकांतदादांनी सांगितले. माढा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून कोणत्याही उमेदवाराचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही, तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते बसून उमेदवार निश्चित करतील, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
लोकसभा निवडणुकीची भाजपकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. राज्यातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघाचा सर्व्हे पूर्ण झालेला आहे. पण कोणत्याही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाचा निर्णय अद्याप झालेला नाही, अशी माहिती चंद्रकांतदादांनी दिली. 'आपल्याला उमेदवारी मिळेल,' अशी आशा असलेले धैर्यशील मोहिते पाटील सध्या तयारीला लागले आहेत. ते गावोगावी दौरे करीत आहेत. तर दुसरीकडे रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी गाठी भेटी सुरु केल्या आहेत.
माढा मतदारसंघ म्हणजे पवारांचा बालेकिल्ला असं मानलं जातं मात्र, 2019 च्या निवडणुकीत भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडलं. 2019 ला भाजपचे रणजितसिंह नाईक निबांळकर हे विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अपक्ष उभे राहिलेल्या संजय मामा शिंदे यांचा पराभव केला होता. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.