Ramraje Nimbalkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ramraje Nimbalkar : रामराजेंनी घेतली विजयसिंह मोहिते पाटलांची भेट; नेमकं काय कारण?

Vijay Singh Mohite Patil : माढा लोकसभा मतदारसंघांत राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.

उमेश बांबरे : सरकारनामा न्यूजब्युरो

Madha loksabha News : विधान परिषदेचे माजी सभापती व आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी बुधवार माढा लोकसभा मतदारसंघातील शिष्टमंडळासह अकलूज येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची त्यांच्या शिवरत्न या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात चर्चांना उधाण आले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्यावतीने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा संधी देण्याबाबतचे वक्तव्य  मंगळवारी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule ) यांनी केले होते. त्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघांत राजकीय  हालचाली गतिमान झाल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

फलटणचे नेते विधान परिषदेचे माजी सभापती, आमदार रामराजे नाईक निंबाळकर(Ramraje Nimbalkar) यांचे व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे फारसे जमत नाही. 2019 च्या निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर रणजितसिंह खासदार झाले. त्यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या गटाने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मदत केल्यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार झाले होते.

मोहिते पाटील कुटुंबांमधील असणारे धैर्यशील मोहिते - पाटील यांनी दिवाळीमध्ये कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आपण लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर अनेकदा त्यांनी अकलूज येथे जाऊन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील(Vijay Singh Mohite Patil) यांची भेट घेतली होती.

त्यानंतर आता अकलूज येथे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शिवरत्न या निवासस्थानी विधान परिषदेचे माजी सभापती व आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी शिष्टमंडळाने जाऊन भेट घेणे अनेकांना धक्का देणारे आहे.

यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गट) सातारा जिल्हाध्यक्ष  संजीवराजे नाईक निंबाळकर, युवा नेते धैर्यशील मोहिते पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती अर्जुनसिंह मोहिते- पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई प्रमुख उपस्थिती होती.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT