Police deployed near newly installed statue in Madha amid controversy involving Shivaji Maharaj and Babasaheb Ambedkar. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Madha Statue Controversy : माढ्यात चाललंय काय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारीच रातोरात उभारला आंबेडकरांचा पुतळा, नव्या वादाची शक्यता

Modnimb Shivaji Maharaj and Babasaheb Ambedkar Statue : मागील काही दिवसांपासून माढा तालुक्यात रात्रीत पुतळे उभारण्याचे पेव फुटले आहे. जवळपास 10 हून जास्त पुतळे रात्रीत उभारल्याचं बोललं जात आहे. मात्र, परवानगी न घेता असे बेकायदेशीर पुतळे उभारणाऱ्यांचा सुळसुळाट झाल्याने प्रशासनाची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे.

Jagdish Patil

Madha statue controversy : माढा तालुक्यातील अंजनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. अंजनगाव मध्ये धनगर आणि मराठा समाजाज आमनेसामने आले होते. त्यानंतर अनेक नेत्यांच्या आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या मध्यस्तीनंतर अखेर या वादावर तोडगा काढण्यात आला.

या वादावर तोडगा निघून आठवडा होत नाही तोच माढा तालुक्यातील मोडनिंब मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची रात्रीत उभारणी केल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पहाटे एकच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे.

दरम्यान, मोडनिंबच्या ग्रामपंचायत समोर नुकताच छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळा उभारण्यात आला होता. या पुतळ्याच्या कायदेशीर बाबींचा गोंधळ सुरु असतानाच अचानकपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा याच परिसरात उभारण्यात आला आहे.

त्यामुळे या ठिकाणी देखील अंजनगाव प्रमाणे नवा वाद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, परिस्थितीचे गांभीर्य ओळखत टेंभुर्णी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तर काही वेळातच अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्यने या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यामुळे आता या परिस्थितीवर काहीतरी तोडगा निघण्याची शक्यता आहे.

मात्र, मागील काही दिवसांपासून माढा तालुक्यात रात्रीत पुतळे उभारण्याचे पेव फुटले आहे. जवळपास 10 हून जास्त पुतळे रात्रीत उभारल्याचं बोललं जात आहे. मात्र, परवानगी न घेता असे बेकायदेशीर पुतळे उभारणाऱ्यांचा सुळसुळाट झाल्याने प्रशासनाची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे.

दरम्यान, ज्या महापुरूषांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजात एकोपा रहावा यासाठी खर्ची घातलं. त्याच महापुरूषांच्या पुतळ्यांचा वापर करून काही लोक दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आणि लाजिरवाणी बाब असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT