Iran Ceasefire Conditions: इराणचा मास्टरस्ट्रोक! युद्ध थांबवलं पण झालेलं सर्व नुकसान भरून काढलं; ट्रम्प यांच्यासमोर शस्त्रसंधीसाठी ठेवलेल्या अटी जाणून थक्क व्हाल

Iran ceasefire conditions explained : डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर इराणचे परराष्ट्र मंत्री, सय्यद अब्बास अराघची, यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला. इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या वतीने निवेदन जारी करत त्यानी दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी केल्याचं मान्य केलं.
Iran conditions ceasefire
Donald Trump addressing global tensions as the US and Iran agree to a temporary ceasefire, easing fears of a major conflict.Sarkarnama
Published on
Updated on

what conditions Iran put for ceasefire with US: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल 'इराणची संपूर्ण संस्कृती नष्ट होईल, जी पुन्हा कधीही परत आणता येणार नाही', असा गंभीर इशारा दिला आणि संपूर्ण जगात एकच खळबळ उडाली. ट्रम्प आता इराणवर कसा आणि किती भयानक हल्ला करणार याच विचारात संपूर्ण जग होतं.

मात्र, ट्रम्प आणि इराण यांच्यात पाकिस्तानच्या मध्यस्थीने शस्त्रसंधी झाली आणि संपूर्ण जगाने सुटकेचा निश्वास सोडला. मात्र, ही शस्त्रसंधी दोन आठवड्यांसाठी असल्याचंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, इराण देखील अमेरिकेला घाबरलेला नाही तर त्याने अमेरिकेसमोर दहा अटी ठेवत शस्त्रसंधी मान्य केली आहे.

त्यामुळे इराणने संपूर्ण शरणागती पत्करली नसल्याचंही स्पष्ट झालं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर इराणचे परराष्ट्र मंत्री, सय्यद अब्बास अराघची, यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला. इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या वतीने निवेदन जारी करत त्यानी दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी केल्याचं मान्य केलं.

Iran conditions ceasefire
US Iran Ceasefire : अखेर इराण-अमेरिका युद्ध थांबलं! राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून एका अटीवर शस्त्रसंधीची घोषणा

मात्र, यावेळी त्यांनी जर अमेरिकेने हल्ला केला तर आम्हीही प्रतिहल्ला करू असा इशारा दिला आहे. तर इराणने अमेरिकेसमोर शस्त्रसंधीसाठी कोणत्या अटी ठेवल्या आहेत ते जाणून घेऊया. पहिली अट म्हणजे अहिंसेप्रती कटिबद्ध राहणं, आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे जी होर्मुज सामुद्रधुनी ट्रम्प खुली करण्याचं आवाहन करत आहेत त्यावर इराणचंच नियंत्रण कायम राहणार अशी अट इराणने घातली आहे.

यासह, युरेनियम संवर्धनास परवानगी, सर्व प्राथमिक आणि दुय्यम निर्बंधांची समाप्ती करणं. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सर्व ठरावांचा आणि गव्हर्नर्स बोर्डच्या सर्व ठरावांचा अवलंब थांबवणे, यासह इराणला नुकसानभरपाई देण्यासह पश्चिम आशियातील अमेरिकेच्या सैन्याची माघार घेणं, शिवाय लेबनॉनमधील हिझबुल्लाहविरुद्ध युद्धासह सर्व संघर्षांवर युद्धविराम करणं अशा मोठ्या अटी इराणने अमेरिकेसमोर ठेवल्या आहेत.

Iran conditions ceasefire
NEP 2020 Maharashtra : महाराष्ट्रात ग्रॅज्युएशन आता 4 वर्षांचं! NEP आधारे फडणवीस सरकारकडून अभ्यासक्रमात मोठा बदल

दरम्यान, सध्या दोन आठवड्यांसाठी युद्धबंदी झाली असली तरी कायमची युद्धबंदी करण्यासाठी इराणची अमेरिकेशी इस्लामाबादमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेचे उप-राष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स इस्लामाबादला जाण्याची शक्यता आहे. यावेळी इराणने ठेवलेल्या 10 कलमांच्या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com