Vinod Ranware Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Madha News : आमसभेत गंभीर आरोप झालेल्या माढ्याच्या तहसीलदारावर अखेर निलंबनाची कारवाई

Vinod Ranware suspended : आमदार अभिजीत पाटील यांनी आमसभेत अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली होती.सर्वसमान्य जनता आणि शेतकऱ्यांची कामे करा; अन्यथा तुमच्या निलंबनाची शिफारस करेन, असा दमही पाटील यांनी भरला होता.

अक्षय गुंड

Madha, 29 April : आमसभेपासून चर्चेत आलेले माढ्याचे तहसीलदार विनोद रणवरे यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. शासकीय कामात गंभीर अनियमितता केल्याचा ठपका ठेवत राज्य सरकारने रणवरे यांच्यावर ही कारवाई केली आहे. आमसभेत झालेल्या गंभीर आरोपापासून तहसीलदार रणवरे हे रजेवर होते.

दरम्यान, आमसभेत त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात (NCP SP) असलेल्या एका नेत्याने तसहीलदार रणवरे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते. त्याच आमसभेत एका महिलेने तहसीलदार रणवरे यांना रस्त्याच्या प्रश्नावरून कोंडीत पकडले होते. तेव्हापासून रणवरे हे चर्चेत आले होते.

माढा (Madha) येथील कामकाजावर नियंत्रण न ठेवणे, कार्यालयीन तपासणीतील बाबींबाबत संधी देऊनही सुधारणा न करणे, तसेच, अवैध गौणखनिज प्रकरणात योग्य प्रकारे कारवाई न करणे, खाणपट्टा मंजुरीच्या अनुषंगाने मागणी केलेला अहवाल दीर्घ मुदत्तीनंतरही वरिष्ठ कार्यालयास सादर न करणे. कार्यालयाच्या तपासणीनंतर शकपूर्ततेवेळी या बाबी निदर्शनास आलेल्या असतानाही रणवरे यांनी कामकाजाकडे दुर्लक्ष करून गंभीर अनियमितता केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्य सरकारकडून तहसीलदार विनोद रणवरे यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबन कालावधीत तहसीलदार रणवरे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात हजेरी लावावी लगणार आहे. तसा उल्लेख निलंबन पत्रात करण्यात आलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय त्यांना इतरत्र जाता येणार नाही

काही दिवसांपूर्वी आमदार अभिजीत पाटील यांनी घेतलेल्या आमसभेत नागरिकांनी तहसीलदार विनोद रणवरे यांच्या विरोधात तक्रारींचा पाढा वाचला होता. आमसभेतून चर्चेत आलेले हे तहसीलदार विनोद रणवरे आजाराचे कारण देत दोन महिन्यांपासून रजेवर होते. अखेर रणवरेंना निलंबीत करण्यात आलं आहे.

संजय कोकाटे यांनी आमसभेत तहसीलदार रणवरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. पुढाऱ्यांनी सांगितलेले एकही काम तहसीलदार रणवरे करत नाहीत. त्यांच्या एजंटांडून आलेली कामे मात्र ते तातडीने करतात, असे कोकाटे यांनी म्हटले होते.

आमदार अभिजीत पाटील यांनी आमसभेत अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली होती.सर्वसमान्य जनता आणि शेतकऱ्यांची कामे करा; अन्यथा तुमच्या निलंबनाची शिफारस करेन, असा दमही पाटील यांनी भरला होता. त्यानंतर दोन महिन्यांतच तहसीलदार विनोद रणवरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT