Ranjitsinh Naik Nimbalkar, Jaykumar Gore sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maan : माढा भाजपचा बालेकिल्ला असल्याचे दाखवून देणार.... जयकुमार गोरे

Jaykumar Gore गेल्या लोकसभा निवडणूकीत अनेक नाट्यमय घडामोडी आणि उलथापालथींनी गाजलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात शत प्रतिशत भाजपचा अजेंडा पुन्हा एकदा सुरु झाला आहे.

विशाल गुंजवटे

Maan News : माढा मतदारसंघातील दुष्काळी भागाला आपल्या केंद्र सरकारने भरीव निधी दिला आहे. आता राज्यातही आपलेच सरकार आहे. या मतदारसंघातील कामांची गती वाढवून जनतेला अपेक्षित असलेला विकास आपण साधत आहोत. भाजपाच्या BJP अजेंड्याप्रमाणे राज्यातून ४५ पेक्षा अधिक जागा जिंकायच्या आहेत. माढा Madha भाजपचा बालेकिल्ला असल्याचे आपल्याला दाखवून द्यायचे आहे. आपले खासदार तरुण असून त्यांच्याकडे केंद्रीय नेतृत्व मोठ्या उमेदीने पहात आहे. आपल्याला यश मिळवायचेच आहे. त्यासाठी सर्वांनी तयारीला लागावे, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे Jaykumar Gore यांनी केले.

बोराटवाडी (ता.माण) येथे भाजपची नुकतीच बैठक झाली. त्यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, मतदारसंघाचे प्रभारी आमदार प्रशांत परिचारक, राम सातपुते, धैर्यशील मोहिते पाटील, राजकुमार पाटील, जयकुमार शिंदे, शशिकांत चव्हाण, के. के.पाटील, शिवाजीराव शिंदे, धनंजय चव्हाण, अरुण गोरे, बजरंग गावडे, सोमनाथ भोसले, हरिभाऊ जगदाळे, विशाल बागल, सर्व तालुकाध्यक्ष उपस्थित होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा मतदारसंघ अशी ओळख असलेल्या माढ्यात गेल्या लोकसभा निवडणूकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. पवारसाहेब या मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडणूक लढणार होते. तशी तयारी सुरु झाली होती. त्याचवेळी सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील समविचारींनी दबाव गट तयार करुन त्यांच्यापैकी एकाची उमेदवारी देण्याची मागणी केली होती. त्यावेळीही हालचालींचा केंद्रबिंदू बोराटवाडीच होते.

शहाजीबापू पाटील संजयमामाही त्या गोटात सामील होते. त्याच दरम्यान, राष्ट्रवादीला पार्थ पवारांनाही लोकसभेची उमेदवारी द्यावी लागली होती. सुप्रिया सुळेंसह एकाच घरातील तीन सदस्य लोकसभा निवडणूक लढण्यावर राज्यभर टीकाटिप्पणी झाली. तोपर्यंत माढ्यातील दबावगटाचे दबावतंत्र चांगलेच वाढले होते. पवार साहेबांनीही रागरंग ओळखून माढ्यातून माघार घेत लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता.

पवार साहेबांच्या माघारीनंतर माढ्यातून भाजपाकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादीकडून संजयमामांनी निवडणूक लढवली होती. आमदार जयकुमार गोरेंनी सातारा जिल्ह्यातून निंबाळकरांना ठरल्याप्रमाणे जाहीर पाठिंबा देत निवडणूकीची सुत्रे हाती घेतली होती. पवारांचा मतदारसंघ म्हणून राष्ट्रवादीने मोठी ताकदपणाला लावूनही साताऱ्यासह सोलापूर जिल्ह्यातून भाजपला मोठे मताधिक्य मिळाले होते. आता आगामी लोकसभा निवडणूकांसाठी भाजपने तयारी सुरु केली आहे. माढ्यावर पुन्हा वर्चस्व राखण्यासाठी हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत.

माढा आणि यावेळेलाही विरोधकांना गाडा...

गेल्या लोकसभा निवडणूकीत अनेक नाट्यमय घडामोडी आणि उलथापालथींनी गाजलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात शत प्रतिशत भाजपचा अजेंडा पुन्हा एकदा सुरु झाला आहे. या मतदारसंघावर पुन्हा एकदा वर्चस्व राखण्यासाठी भाजप कोअर कमिटीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्या अनुषंगाने गेल्या निवडणूकीचे किंगमेकर, साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्या बोराटवाडी येथील निवास्थानी मॅरेथॉन बैठक पार पडली. बुथ कमिट्यांपासून मतदारसंघातील सर्व तालुक्यांमधील गट आणि गणनिहाय आढावा घेऊन " माढा आणि यावेळेलाही विरोधकांना गाडा " असा नारा देण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT