Shivaji Sawant Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Tanaji Sawant : आरोग्य मंत्र्यांचा सावंत परिवार महायुतीविरोधात निर्णय घेणार? माढ्यासह चार मतदारसंघांवर इफेक्ट होणार?

Sawant family Mahayuti Opposition: माढ्यातून विधानसभा उमेदवारीत महायुतीकडून डावलण्यात आलेले शिवाजी सावंत यांनीही आज कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आपल्या भावना व्यक्त केल्या. माघारीनंतर उद्या दुपारी चारनंतर आपला निर्णय जाहीर करण्यात येईल, असे सावंत यांनी स्पष्ट केले.

Vijaykumar Dudhale

Solapur, 03 November : विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उद्या (ता. 04नोव्हेंबर) एक दिवसाचा कालावधी उरला असून सर्वच राजकीय पक्षाचे नेते विजयाची गणिते सोडविण्यात गुंतले आहेत. त्यातच माढ्यातून विधानसभा उमेदवारीत महायुतीकडून डावलण्यात आलेले शिवाजी सावंत यांनीही आज कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आपल्या भावना व्यक्त केल्या.

माघारीनंतर उद्या दुपारी चारनंतर आपला निर्णय जाहीर करण्यात येईल, असे सावंत यांनी स्पष्ट केले. मेळाव्यातील कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत हे उद्या महायुतीच्या विरोधात निर्णय घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत (Shivaji Sawant) हे माढा विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र, महायुतीमध्ये माढ्याची जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली आहे. राष्ट्रवादीने माढ्याच्या नगराध्यक्ष मीनल साठे यांना उमेदवारी जाहीर केली आहे, त्यामुळे दुखावलेल्या सावंत परिवाराने आपल्या मनातील खदखद कार्यकर्त्यांच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.

महायुतीकडून (Mahayuti) डावलण्यात येत असल्याची भावना सावंत यांच्या कार्यकर्त्यांकडून आज मेळाव्यात व्यक्त करण्यात आली. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर उद्या सायंकाळी सावंत परिवाराचा निर्णय जाहीर करण्यात येईल. तो निर्णय वरून नाही तर सावंत यांच्या बंगल्यावर होईल, असेही शिवाजी सावंत यांनी स्पष्ट केले.

सावंत परिवाराची ताकद ही माढा, करमाळा, पंढरपूर, मोहोळ या मतदारसंघात आहे. या मतदारसंघात आम्ही आमची ताकद दाखवून देऊ असा इशारा सावंत यांनी दिला आहे. आजचा महायुतीचा मेळावा नसून सावंत परिवाराच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होता. सावंत परिवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये महायुतीबाबत काय भावना आहेत, हे दाखवण्यासाठीच हा मेळावा आयोजित करण्यात आला होता, अशी पुष्टीही शिवाजी सावंत यांनी यावेळी जोडली.

दरम्यान, महायुतीकडून माढ्याच्या उमेदवारीबाबत डावलण्यात आल्यामुळे दुखावलेले शिवाजी सावंत हे उद्या महायुतीच्या विरोधात की बाजूने निर्णय घेतात हे उद्या दुपारी माघारीनंतर स्पष्ट होणार आहे.

शिवाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पंढरपूर मतदार संघातून निवडणूक लढवत आहे. अनिल सावंत यांना तुतारीची उमेदवारी कायम राहिली तर सावंत परिवार उद्या कदाचित तुतारीच्या बाजूने निर्णय घेऊ शकतो, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT