Priyanka Chaturvedi : 'महायुती सब से महा'झुठी' है, जनता को महा'लुटा' है'; शिवसेना'UBT'च्या खासदार चतुर्वेदी भडकल्या

ShivSenaUBT MP Priyanka Chaturvedi strongly criticized the mahayuti : शिवसेना'UBT'च्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका करत, महा'झुठी' युती असे म्हटलं आहे.
Priyanka Chaturvedi
Priyanka ChaturvediSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढला असून, विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर टीकेची संधी सोडत नाही.

शिवसेना'UBT'च्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी "महायुती सरकार सर्वात मोठी महा'झुठी' है, जो जनता को महा'लुट' रही है", असे म्हणत जोरदार टीका केली.

विधानसभा निवडणुकीचा राज्यात प्रचाराचा ज्वर चढला आहे. उमेदवारी माघारी घेण्याच्या चार नोव्हेंबरनंतर राज्यातील निवडणुकीच्या (Election) लढतीची चित्र स्पष्ट होईल. दरम्यान, दिवाळीच्या शुभेच्छा देताना, विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडताना दिसत नाही.

Priyanka Chaturvedi
Ashok Chavan : अपक्षांचा 'आकडा' भाजप नेते माजी 'CM' चव्हाणांची वाढवतोय डोकेदुखी

शिवसेना'UBT'च्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला. "युतीची चर्चा करतात, ते खोटं पेरत आहेत. सत्तेसाठी यांची युती झाली. यांची सत्तेची भूक मोठी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ज्यांच्यावर 70 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला, त्यांनाच बरोबर घेऊन सत्तेत बसले आहेत. ते आता उपमुख्यमंत्री आहेत", असा घणाघात खासदार चतुर्वेदी यांनी केला.

Priyanka Chaturvedi
MNS News : उमेदवारी अर्ज बाद अन् खळखट्याक! मनसैनिकांनीच फोडलं 'मनसे'चं ऑफिस

"महायुतीमधील एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राची विकास करत नाहीत, तर आपला विकास करत आहे. महायुती म्हणवतात, पण राज्यातील काही जागांवर हे तिन्ही पक्षांनी आपपाले उमेदवार एकमेकांसमोर उभे केले आहेत. या तिघांमध्ये ताळमेळ नाही. महायुती नसून, महा'झुठी' है, महाराष्ट्राला महा'लुटा' है अन् महा'भ्रष्टाचार' केला आहे", अशीही जोरदार टीका खासदार चतुर्वेदी यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com