Mahabaleshwar Flex
Mahabaleshwar Flex sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

महाबळेश्वर : राष्ट्रवादीचा हा नेता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाणार..?

रवीकांत बेलोसे

भिलार : महाराष्ट्रात सत्ता बदलासाठी एकनाथ शिंदे यांनी थेट मातोश्रीलाच आव्हान देत मोठी बंडखोरी करीत शिवसेनेला खिंडार पाडले. याचे श्री. शिंदे यांच्या जन्मभूमीतही पडसाद उमटले असून जावळी - महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष संजय मोरे यांनी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवणारे फलक स्वतःच्या नावासह संपूर्ण महाबळेश्वर तालुक्यात लावले आहेत. त्यामुळे ते लवकरच राष्ट्रवादीला राम राम ठोकत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.

महाबळेश्वर तालुक्याचे भूमिपुत्र नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष नेतृत्वावर तोफ डागत ४० आमदारांना घेवून बंडखोरी केली आहे. त्यामुळे महविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. याचे पडसाद महाबळेश्वर तालुक्यात उमटले आहेत. महाबळेश्वर तालुक्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. परंतु अनेकदा या पक्षातील सुंदोपसंदी अनेकदा चव्हाट्यावर आलेली पहायला मिळाली.

गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीत असूनही संजय मोरे यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला मदत करून निवडून आणण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. त्यावेळीच श्री. मोरे शिवसेनेच्या विचारांशी जुळले होते. परंतु पुढे काहीही घडले नाही. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीचा निषेध महाबळेश्वर व पांचगणी येथे शिवसेनेने केला आहे. परंतू, राष्ट्रवादीच्या आणि राष्ट्रवादीची सत्ता असणाऱ्या संस्थेतील उपाध्यक्ष यांनी मात्र, शिवसेनेच्या बंडखोर एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवणारे फलक स्वतःच्या नावासह संपूर्ण तालुक्यात लावले आहेत.

त्यामुळे राष्ट्रवादीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. मात्र, संजय मोरे हे शिवसेनेत जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याच बरोबर तालुक्यातील पंचायत समितीचे तीनही माजी सभापती सेनेच्या संपर्कात असून आगोदर कोण जाणार यावर सर्व अवलंबून आहे. त्यामुळे महाबळेश्वर तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT