'आमचा मुख्यमंत्री असूनही औरंगाबादचे नामांतर राष्ट्रवादी आणि कॅाग्रेसने करू दिले नाही'

Deepak Kesarkar : बंडखोर आमदार दिपक केसरकर यांनी राष्ट्रवादी कॅाग्रेस आणि कॅाग्रेसवर टीका केली आहे.
Deepak Kesarkar Latest News
Deepak Kesarkar Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

Deepak Kesarkar : ज्या शिवसेनेमुळे (Shivsena) राष्ट्रवादी कॅाग्रेस (NCP) आणि कॅाग्रेस (Congress) सत्तेत आहेत. त्यांच्याकडून आमच्या मुखमंत्र्याचा अपमान केला जात होता. आम्हाला दुय्यम दर्जाची खाते दिले गेेली. मात्र, आम्ही ते सुद्धा सहन केले. मात्र, छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांचे नाव औंरगाबादला द्यायच्या निर्णयालाही राष्ट्रवादी आणि कॅाग्रेसकडून विरोध करण्यात आला, असा आरोप बंडखोर शिंदे गटाचे आमदार दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केला आहे. त्यांनी आज एका खासगी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. (Deepak Kesarkar Latest News)

Deepak Kesarkar Latest News
'मुख्यमंत्री ठाकरेंनी शेवट गोड करावा,आम्ही त्यांच्या निर्णयाची वाट बघतोय'

केसरकर म्हणाले, राष्ट्रवादीकडून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवसेनेमुळे महाविकास आघाडी सत्तेत असूनही आम्हाला दुय्यम दर्जाची खाते मिळाली. मात्र, आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असल्यामुळे आम्ही हे सहन केलं. त्यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचा अपमान केला जात होता. तर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव औंरगाबादला देण्याचा निर्णय आमचा मुख्यमंत्री असूनही राष्ट्रवादी कॅाग्रेस आणि कॅाग्रेसकडून यास विरोध करण्यात आला. यामुळे हे नामांतर झाले नाही. ही खंत आमच्या मनात होती. यामुळे आम्ही हे पाऊलं उचलल्याचे मत केसरकर यांनी व्यक्त केले आहे.

Deepak Kesarkar Latest News
उद्धव ठाकरेंच्या भोवतीचे बडवे कोण; बंडखोरांचा या नेत्यांवर निशाणा

पुढे बोलतांना केसरकरांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि कॅाग्रेसवर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेला कमकुवत करण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न केले जात आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर पवार साहेबांवर आमचा विश्वास होता, पण त्यांच्या नेत्यांकडून शिवसेना संपवण्याचे काम केले गेले जात होते. शिवसेनेच्या नेत्यांना सोबत घेऊन काम करण्याचे धोरण जर राष्टवादीकडून ठरवले असते तर आज ही वेळ आली नसती. तसेच, पवारांनी आतापर्यंत तीन वेळा शिवसेना फोडली. आणि आम्हाला गद्दार म्हटले जात आहे, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Deepak Kesarkar Latest News
आम्हाला कोंढलं नाय...मारलं नाय...हाणलं नाय : शहाजीबापूंची पुन्हा डायलॉग बाजी!

दरम्यान, आम्ही आजही शिवसेनेतच आहेत. आम्ही भाजपमध्ये विलिन होणार असा प्रचार केला जात होता. मात्र, तसे झाले नाही. आताही वेळ गेली नाही. जर ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये जर चर्चा झाली असेल तर याकडे आम्ही सकारात्मकतेने बघतो. पंतप्रधान सध्या जर्मनीमध्ये असल्याने त्यांनी राज्यातील भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करावी आणि राज्याच्या हितासाठी तडजोड करावी. आम्हाला गुवाहाटीला थांबायला मर्यादा आहेत. ठाकरे हे शेवट गोड करू शकतात. त्यांनी आजही याबाबत विचार करावा त्यांच्या निर्णयाची आम्ही वाट बघत आहोत, असे आवाहनही केसरकरांनी ठाकरेंना केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com