Mahadev Jankar Latest News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mahadev Jankar : महादेव जानकर भाजपचे टेन्शन देशभर वाढविणार

Mahadev Jankar Lok Sabha Election : रासपच्या महादेव जानकरांनी भाजप विरोधात दंड थोपटले आहेत...

Anand Surwase

Mahadev Jankar Solapur News :

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आणि गटाकडून निवडणुकीची पूर्वतयारी करण्यात येत आहे. त्याप्रमाणेच राष्ट्रीय समाज पक्षानेदेखील आगामी लोकसभा निवडणुकीत 250 पेक्षा जास्त जागा लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच स्वत: रासपचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर हेदेखील माढा आणि परभणी लोकसभा मतदारसंघांतून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. या दोन्ही मतदारसंघांतून मी 1.5 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडणून येणार असल्याचा विश्वासही जानकर यांनी व्यक्त केला आहे. ते रविवारी सोलापुरात बोलत होते.

जानकर म्हणाले, 'lok sabha election 2024 साठी राष्ट्रीय समाज पक्ष पूर्ण ताकदीने निवडणुका लढवणार आहे. महाराष्ट्रात आम्ही सर्व 48 जागांवर आमचे उमेदवार उभे करणार आहोत. याशिवाय संपूर्ण देशभरात महाराष्ट्रातील 48 जागांसह 250 पेक्षा जास्त जागा आम्ही लढवणार आहोत.' 'यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये 80, गुजरातमध्ये 22, दिल्लीमध्ये 05, हरियाणामध्ये 5, मध्य प्रदेश 9, छत्तीसगडमध्ये 6, राजस्थानात 5, कर्नाटक 12, तामिळनाडू 06, आसाममध्ये 3, गोव्यात एक यासह अन्य काही राज्यांमध्ये रासपचे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात दिसतील', असेही जानकर यांनी स्पष्ट केले.

माढा आणि परभणीतून ठोकणार शड्डू

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत स्वत: महादेव जानकर हे माढा आणि परभणी या दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवणार असल्याचेही जानकर यांनी स्पष्ट केले. या दोन्ही मतदारसंघांत मी उमेदवारी अर्ज भरणार असून, या दोन्ही मतदारसंघांमधून सुमारे दीड लाखाच्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा विश्वास जानकर यांनी व्यक्त केला. माढा मतदारसंघात सध्या भाजपचे रणजितसिंह निंबाळकर विद्यमान खासदार आहेत, तर परभणी मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे संजय जाधव हे विद्यमान खासदार आहेत. याच पार्श्वभूमीवर येत्या 17 तारखेला माढा मतदारसंघात "माढा विजय निर्धार" मेळाव्याचे आयोजन केले असून, या मेळाव्यातून आपण लोकसभा निडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याचेही जानकरांनी स्पष्ट केले.

'आमच्याशिवाय पर्याय नसेल'

सद्य:स्थितीमध्ये आमचा पक्ष लहान आहे. मात्र, आगामी काळात राज्यातील सत्तास्थापनेच्या गणितामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची महत्त्वाची भूमिका असणार आहे. आम्हाला सोबत घेतल्याशिवाय राज्याच्या सत्तेची समीकरणे जुळणार नाहीत. त्यामुळे मी स्वत: यापुढे राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात सक्रिय होणार असून, राज्यात किमान 25 आमदार हे रासपचे तरुण उमेदवार असतील. तसेच आगामी निवडणूक ही जनता हातात घेणार आहे. जनता आता फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळली असून, हे सर्व उघड्या डोळ्याने पाहात आहे. त्यामुळे जनता भाजप काँग्रेससारख्या मोठ्या पक्षांच्या पाठीमागे धावणार नसल्याचेही मत जानकर यांनी या वेळी व्यक्त केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपमधील नाराजांचा रासपमध्ये सन्मान होईल. राज्याच्या राजकारणात भाजपने फोडाफोडीचे राजकारण सुरू केले असून, आयात उमेदवारांना संधी दिली जात आहे. परंतु यामुळे तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपासून ते निवडणुकीची तयारी करणाऱ्या नेत्यांमध्ये नाराजी निर्माण होत आहे. विरोधकच भाजपमध्ये येऊन पदे उपभोगत असल्याने भविष्यात भाजपमधील मूळ उमेदवारांना संधी मिळण्यात अडसर निर्माण होत असल्याने अनेक नेते नाराज आहेत. त्या सर्वांसाठी रासपची दारे खुली आहेत. भाजपमधील नाराज नेत्यांनी रासपमध्ये यावे, त्यांचा योग्य सन्मान ठेवला जाईल आणि त्यांना संधीही दिली जाईल, असे आवाहनदेखील जानकर यांनी या वेळी केले आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT