Mahadev Jankar's Announcement : महादेव जानकर लोकसभेची निवडणूक दोन जागेवरून लढणार; कोणते ते दोन मतदारसंघ?

Loksabha Election 2024 : राष्ट्रीय समाज पक्ष भारतात जिथे उमेदवार मिळतील, त्या ठिकाणी लोकसभेच्या जागा लढवणार आहे.
Mahadev Jankar
Mahadev JankarSarkarnama

Solapur News : माढा आणि परभणी या दोन मतदारसंघांतून मी स्वतः लोकसभेची निवडणूक लढवणार आहे. विरोधात कोणीही असले तरी दीड लाखाच्या मताधिक्याने मी निवडून येणार आहे, असा दावा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष, आमदार महादेव जानकर यांनी केला. (Mahadev Jankar will contest the Lok Sabha elections from two constituencies)

माजी मंत्री महादेव जानकर हे सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर आपण दोन मतदारसंघांतून लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mahadev Jankar
Mahavikas Aghadi : ‘सर्व्हेत महाविकास आघाडीला अधिक जागा; त्यामुळेच नेते पळविले जाताहेत’

जानकर म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्ष भारतात जिथे उमेदवार मिळतील, त्या ठिकाणी लोकसभेच्या जागा लढवणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेशमधील 80, महाराष्ट्रातील 48, कर्नाटक, छत्तीसगढ येथील काही जागांवर आपला पक्ष निवडणूक लढवणार आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी जानकर यांनी आपण परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले हाेते. तसेच, माढ्याबाबत सूतोवाच केले होते. आता त्यांनी या दोन मतदारसंघांतून निवडणूक लढविण्याची घोषणाच करून टाकली आहे. मात्र, जानकर हे महायुतीत राहतात की स्वतंत्र निवडणूक लढवितात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस सोडण्याबाबत महादेव जानकर यांनी भाष्य केले. ते म्हणाले, अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याबाबतीत मला काही कल्पना नाही. त्यांच्या राजीनाम्याबाबत मला बातम्यांमधूनच कळाले. त्यावर मी अभ्यास करून बोलेन, पण जे लोक सत्य आहेत, तेच राहतात, ज्यांना काही अडचणी आहेत, ते असा निर्णय घेत असतील.

Mahadev Jankar
Praniti Shinde on Chavan Resign : ‘अशोक चव्हाणांसोबत भाजपने मोठा माइंड गेम खेळलाय; हताश होऊन त्यांनी राजीनामा दिलाय’

आम्ही महायुतीमध्ये होतो; म्हणून भाजप सत्तेत होती. आम्ही नसल्यावर बघू आता काय होतं ते. ज्या लोकांवर आरोप केले आहेत, त्यांचा पक्ष प्रवेश घेतला, याचं उत्तर येणाऱ्या निवडणुकीत जनताच देईल, असा इशाराही जानकर यांनी भाजपला दिला. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेबाबत मात्र महादेव जानकर यांनी बोलण्यास नकार दिला.

Edited By : Vijay Dudhale

R

Mahadev Jankar
Ashok Chavan Resign Congress : विश्वासदर्शक ठरावाला उशीर ते भाजप पदाधिकाऱ्याच्या घरची चव्हाणांची ‘ती’ भेट ठरली महत्त्वपूर्ण...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com