Mahadev Jankar News :महादेव जानकरांनी तोफ डागली; ‘भाजपसारखा दगाबाज दुसरा पक्ष नाही’

Jankar On Ashok Chavan : भाजप लहान-लहान पक्षांना सोबत घेऊन त्यांना संपवण्याचे काम करत आहे.
Mahadev Jankar
Mahadev Jankar Sarkarnama
Published on
Updated on

Solapur News : राज्यात जे फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे, त्याला केवळ भाजप जबाबदार असून, भाजपसारखा दगाबाज दुसरा कोणताही पक्ष नाही, अशी घाणाघाती टीका राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केली. भाजप लहान-लहान पक्षांना सोबत घेऊन त्यांना संपवण्याचे काम करत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष फोडण्यामागे भाजपचाच हात आहे, हे लपून राहिले नाही. अशा प्रकारे पक्ष फोडून प्रादेशिक पक्षाचे अस्तित्वच संपवण्याचा घाट भाजपने घातल्याचा आरोप जानकरांनी केला. (Mahadev Jankar strongly criticized BJP)

महादेव जानकर हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. शिवसेना, राष्ट्रवादी फुटीनंतर भाजपने आपला मोर्चा काँग्रेसकडे वळवला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप झाला. अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशावर बोलताना जानकर म्हणाले, अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्याचे समजले. ते भाजपत गेले तर पायावर दगड मारून घेतील. कारण जनता आता हुशार झाली आहे. मतदार अंतिम निर्णय घेऊन अशा प्रकारच्या नेत्यांना जागा दाखवून देईल. तसेच, भाजपला त्यांच्या कर्माची फळे भोगावी लागतील. (Mahadev Jankar News )

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mahadev Jankar
Uddhav Thackeray Shirdi Tour : बाळासाहेब थोरातांच्या लॉबिंगनंतरही ‘शिर्डी’साठी उद्धव ठाकरेंचा गोळाबेरीज दौरा...

भाजपने आजपर्यंत सगळ्या भ्रष्टाचारी नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. ज्यांच्यावर गैरव्यहाराचे आरोप होते, जे नेते अडचणीत आहेत, अशा नेत्यांवर दबाब आणून हे पक्ष प्रवेश घडवून आणले जात आहेत. अजित पवारांवर 70000 कोटींचा आरोप भाजपनेच केला होता. परंतु त्यांनाच सत्तेत सहभागी करून घेत भाजपने आपला खरा चेहरा समोर आणला असल्याचा टोलाही त्यांनी या वेळी लगावला.

भाजप प्रादेशिक पक्ष संपवायला निघाला आहे. आम्हीदेखील त्यांच्यासोबत सत्तेत होतो. मात्र, त्यांनी आमच्यासोबत दगाबाजी केली. पण, आम्ही दबले जाणारे नाहीत, आम्ही सर्वसामान्य जनतेमधून, कुटुंबातून आलेलो आहोत. आम्ही त्यांच्या कोणत्याही दबावाला भीक घातली नाही आणि घालणारही नाही. सर्वसामान्य मतदार आता हुशार झाला असून, ते आमच्यासारख्या पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.

Mahadev Jankar
Loksabha Election 2024 : जयंतरावांच्या चिरंजीवाची हातकणंगलेमधील लोकसभेची ‘हवा’ जिरली

अजित पवार, शिंदेंचा वापर लोकसभेपुरताच

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला 400 पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत. त्यामुळेच त्यांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाही आपल्यासोबत घेतले आहे. प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पाडून फुटीर गटाच्या ताब्यातच पक्ष देण्याचे काम भाजपच्या आशीर्वादानेच होत आहे. परंतु, भाजपसोबत गेलेल्या एकनाथ शिंदे, अजित पवार किंवा अन्य नेत्यांचा वापर केवळ लोकसभेपुरताच केला जाईल. हे सध्या कारवाईच्या भीतीने भाजपसोबत गेले असल्याचा टोलाही जानकर यांनी लगावला. तसेच, शिंदे आणि अजित पवार यांनी पक्षावर दावा केला असला तरी उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे लोकनेते आहेत. त्यांचा जनाधार मोठा आहे, सर्वसामान्य जनता ठाकरे, पवार यांच्यासोबतच राहील, असेही जानकर यांनी या वेळी स्पष्ट केले.

Edited by : Vijay Dudhale

R

Mahadev Jankar
Hiraman Khoskar will Resign? : ‘त्या’ इतिहासामुळे खोसकर काँग्रेस सोडताना दहा वेळा विचार करतील!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com