Mahadev Jankar
Mahadev Jankar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jankar : भाजप पुन्हा स्वबळावर सत्तेत येणार नाही, असा बंदोबस्त आम्ही केलाय : जानकरांनी पुन्हा ललकारले

सरकारनामा ब्यूरो

पंढरपूर : रासपचे नेते महादेव जानकर यांनी एनडीएबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. ''राष्ट्रीय समाज पक्षाला सोबत घेतल्या शिवाय राज्यातील व केंद्रातील एनडीएचे सरकार बनणार नाही. आगामी २०२४ च्या आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत रासपने तसा बंदोबस्त केला आहे'', असा सूचक इशारा देत महादेव जानकर यांनी भाजपला ललकारले आहे.

''लोकसभा निवडणुकीत एनडीएने उमेदवारी नाकारली तर अन्य पर्यायांचा जरूर विचार करु'', असं जानकर यांनी स्पष्ट केलं आहे. रासपच्या पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी मेळाव्यासाठी आज महादेव जानकर (Mahadev Jankar) पंढरपुरात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपला हा इशारा दिला. महादेव जानकर यांनी भाजपला डिवचल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

''रासप सध्या सर्वत्र पक्ष वाढीसाठी काम करत आहे. आम्ही डिमांड करणारे नव्हे तर कमांड मिळवणारे होत आहोत. त्यामुळे २०२४ ला आम्हाला विचारात घेतल्याशिवाय एनडीएचे सरकार बनणार नाही. यांची आम्ही काळजी घेऊ. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बारामती (Baramati), परभणी (Parbhani) आणि माढा या तीन मतदारसंघावर आपले लक्ष आहे. एनडीएने आपली उमेदवारी नाकारली तर आपण निवडणूक लढणार आहे'', असे यावेळी जानकरांनी सांगितलं.

दरम्यान, ''पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या मागे आपण एक भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी राहू. मात्र, त्यांच्या नाराजीबद्दल भाजप (BJP) योग्य तो निर्णय घेईल, अशी सावध प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली. त्यामुळे भाजपला आपल्याच मित्र पक्षाने ललकारल्याने आगामी निवडणुकांमध्ये हा पक्ष स्वबळावर लढणार का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT