Agniveer Rehabilitation Issue sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Agniveer Scheme : अग्निवीरांच्या पुनर्वसनावर सरकारचे मौन : सत्ताधारी आमदाराचा थेट विधानसभेत सवाल; मुद्द्यावरच ठेवलं बोट

MLA Chandradeep Narke Questions Over Agniveer Rehabilitation Policy : केंद्र सरकारच्या अग्निवीर योजनेअंतर्गत सेवा देणाऱ्या जवानांच्या पुनर्वसनाबाबत सत्ताधारी आमदारानेच विधानसभेत सवाल उपस्थित केला आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News : केंद्र सरकारच्या अग्निवीर योजनेअंतर्गत चार वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्या जवानांच्या पुनर्वसनाबाबत राज्य शासनाने अद्याप अधिसूचना जाहीर न केलेली नाही. यावरून आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रदीप नरके यांनी विधीमंडळातच संताप व्यक्त केला आहे. तसेच याबाबतचा निर्णय नेमका कधी होणार असा थेट सवाल सरकारला केला आहे.

आमदार नरके यांनी सांगितले की, अग्निवीर योजनेतून सेवा पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या जवानांसमोर मोठ्या प्रमाणात रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो. या विषयावर त्यांनी मागील अधिवेशनातही प्रश्न मांडला होता. त्यावेळी इतर राज्यांच्या धर्तीवर होमगार्ड, आपत्ती व्यवस्थापन, कारागृह विभाग, वनसंरक्षण तसेच अग्निशामक दल या सेवांमध्ये अग्निवीरांना विशेष प्राधान्य देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन शासनाकडून देण्यात आले होते.

मात्र त्यानंतरही कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही, याकडे नरके यांनी लक्ष वेधले. समितीचा अहवाल सध्या कोणत्या टप्प्यावर आहे, तो कधीपर्यंत सादर होईल आणि त्यानंतर शासन निर्णय (जीआर) नेमका कधी होणार, याची स्पष्टता देण्याची मागणी त्यांनी केली. सैन्यदल, नौदल आणि वायुदलात सेवा बजावलेल्या अग्निवीर जवानांकडे शिस्त, कौशल्य आणि प्रशिक्षणाचा मोलाचा अनुभव असल्याचे सांगत, या अनुभवाचा उपयोग राज्याच्या सेवेत व्हावा.

तसेच राज्यातील हजारो अग्निवीर जवानांच्या भवितव्याचा प्रश्न लक्षात घेता, शासनाने विलंब न लावता स्पष्ट पुनर्वसन धोरण आणि तातडीने शासन निर्णय जाहीर करावा, अशी मागणी आमदार चंद्रदीप नरके औचीत्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत मागणी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT