

Agniveer jobs Maharashtra government : भारतीय सैन्यदलातील अग्निवीर या नवीन भरती योजनेतील अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीला ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत चार वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानंतर या योजनेतील २५ अग्निवीरांची सेवा पुढे नियमित होईल. मात्र, उर्वरित ७५ टक्के अग्निवीरांच्या भवितव्यावर टांगती तलवार निर्माण होऊ शकते. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने आज महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
सैन्यदलातून बाहेर पडणाऱ्या अग्निवीरांना शासकीय किंवा निमशासकीय नोकरी देण्यासाठी सरकारने तयारी सुरू केली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. या शासन निर्णयात म्हटले आहे की, अग्निवीर या नवीन भरती योजनेतील २८३९ अग्निवारांच्या पहिल्या तुकडीला ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२६ मध्ये चार वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानंतर योजनेनुसार अग्निवीरांमधील २५ टक्के अग्निवीरांची सेवा पुढे नियमित होईल.
उर्वरीत ७५ टक्के अग्निवीरांचा पोलीस, वनविभाग, अग्निशमन दल, राज्य राखीव पोलीस दल यांसारख्या शासकीय सेवांमध्ये समावेश करून घेतल्यास त्यांच्या कौशल्य व प्रशिक्षणाचा शासनास उपयोग होऊन, उच्च दर्जाचे प्रशिक्षण पुर्ण झालेले अधिकारी-कर्मचारी शासनास प्राप्त होतील. तसेच अग्निवीर जवानांना स्वयंरोजगाराच्या संधी मिळवून दिल्यास त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यास मदत होईल, असे सरकारने म्हटले आहे.
अग्निवीर जवानांना शासकीय किंवा निमशासकीय सेवेमध्ये संधी देणे, खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये संधी देणे तसेच स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने तसेच त्यांच्या आर्थिक सक्षमतेकरिता विविध उपाययोजना करण्यासंदर्भात राज्य सरकारकडून अभ्यासगट स्थापन करण्यात आला आहे.
राज्याच्या सैनिक कल्याण विभागाचे संचालक निवृत्त कर्नल दिपक ठोंगे हे अभ्यास गटाचे अध्यक्ष असतील. या अभ्यास गटाने तीन महिन्यांत सर्व बाबींचा अभ्यास करून शिफारशींसह आपला अहवाल तीन महिन्यांत शासनास सादर करावा, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.