Ladki Bahin Yojana Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Assembly Election Video : धनंजय महाडिकांच्यानंतर भाजपच्या महिला नेत्याची लाडक्या बहिणींना धमकी, म्हणाल्या, 'मत दिलं नाही तर...'

Maharashtra Assembly Election megharani jadhav BJP : महायुतीकडून लाडक्या बहि‍णींना सत्ता पुन्हा आली तर 1500 रुपयावरून 2100 रुपये देण्यात येतील असे आश्वासन दिले आहे

Roshan More

Assembly Election Video : विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरेल, असा दावा महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात येतो आहे. मात्र, महायुतीमधील काही नेत्यांकडून लाडक्या बहि‍णींबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचे देखील समोर आले आहे. 1500 रुपये घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या प्रचारात दिसल्या तर त्यांचे फोटो काढा, अशी जाहीर धमकी धनंजय माहाडिकांनी दिली होती. त्यानंतर आत्ता कोल्हापूरमधील आणखी एका महिला नेत्याने लाडक्या बहि‍णींना धमकावले आहे.

कोल्हापूर भाजपच्या महिला उपाध्यक्ष मेघारानी जाधव यांनी करवीर मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरकेर यांच्या प्रचारात बोलताना '1500 दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर 3000 वसुल करणार', असे म्हटले आहे. त्यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे.

करवीर मतदारसंघामध्ये काँग्रेसकडून राहुल पाटील उमेदवार आहेत. त्यांचा सामना शिवसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्यासोबत होत आहे. 2019 मध्ये करवीर मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार पी एन पाटील विजयी झाले होते. मात्र, त्यांचे निधन झाल्याने काँग्रेसकडून त्यांचे पुत्र राहुल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

महाडिकांवर कारवाई

'काँग्रेसच्या रॅलित महिला दिसल्या ज्या आपल्याकडून 1500 रुपये घेतात. तर त्यांचे फोटो काढा आम्ही त्यांची व्यवस्था करतो, असे महाडिक म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका देखील झाली होती. त्यांच्या वक्तव्याची दखल निवडणूक आयोगाकडून घेण्यात आली होती. तसेच पोलिस ठाण्यात महाडिक यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल झाला होता.

'मविआ'कडून तीन हजार

महायुतीकडून लाडक्या बहि‍णींना सत्ता पुन्हा आली तर 1500 रुपयावरून 2100 रुपये देण्यात येतील असे आश्वासन दिले आहे. तर, महाविकास आघाडीकडून महालक्ष्मी योजने अंतर्गत महिलांना दरमहा तीन हजार रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

'ते' वक्तव्य बहिणींसाठी नाही

मेघारानी जाधव यांच्या वक्तव्यावर महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्या गटाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. नवऱ्याला उद्देशून हे वक्तव्य झाले आहे. लाडक्या बहिणीला उद्देशून हे वक्तव्य नव्हते. या व्हिडिओची मोडतोड करून करून विरोधकांनी व्हायरल केली आहे. असा आरोपही नरके यांच्या गटाकडून करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT