Sunil Tatkare-Jayant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jayant Patil Vs Tatkare : जयंतराव हे आतल्या गाठीचे; पण आता त्यांचाच करेक्ट कार्यक्रम होणार : तटकरेंचा पलटवार

Assembly Election 2024 : जयंतराव पाटील ज्या चिन्हावर (घड्याळ) १९९९ पासून निवडून येत आहेत, त्या चिन्हाबाबत त्यांनी अशा प्रकारचे भाष्य करणे, योग्य नाही.

Vijaykumar Dudhale

Solapur, 09 November : जयंतराव हे आतल्या गाठीचे आहेत. त्यांचे मनात एक आणि ओटात एक असते. पण करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जयंतरावांचाच आता करेक्ट कार्यक्रम होणार आहे, असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर केला.

माढ्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार मीनल साठे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेपूर्वी माध्यमांशी बोलताना खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी जयंत पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, जयंतराव पाटील ज्या चिन्हावर (घड्याळ) 1999 पासून निवडून येत आहेत, त्या चिन्हाबाबत त्यांनी अशा प्रकारचे भाष्य करणे, योग्य नाही.

करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेल्या जयंतरावांचाच करेक्ट कार्यक्रम आता नक्की होणार आहे. घड्याळाच्या चिन्हाचं त्यांना एवढं भय का वाटावं, असा सवालही सुनील तटकरे यांनी जयंत पाटील (Jayant Patil) यांना विचारला आहे.

ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत ज्यांचा स्ट्राइक रेट जास्तीचा झाला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपण झालोच आहोत, अशी दिवास्वप्नं काहींना पडायला लागली आहेत. त्यांना घड्याळ्याच्या चिन्हाचं एवढं भय वाटतंय, याचा अर्थ स्पष्ट आहे.

जयंतराव हे कसे आतल्या गाठीचे आहेत. त्यांचे मनात एक आणि ओटात एक असते. पण, मनात एवढं नक्की आहे की आता राष्ट्रवादीचं घड्याळ चालणार आहे. त्या चालणाऱ्या घड्याळाच्या भयगंडापोटीच जयंतराव अशी वक्तव्ये करीत आहेत, असा टोलाही सुनील तटकरेंनी जयंतरावांनी लगावला.

जयंत पाटील काय म्हणाले होते?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोलापुरातील प्रचारसभेत बोलताना घड्याळ चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचले होते. आमचा पक्ष आणि घड्याळ चिन्ह चोरीला गेले आहे. पण, जगात कोणत्याही पक्षाला आपल्या चिन्हाखाली ‘आमचं चिन्ह न्यायप्रविष्ठ आहे’ असं लिहावं लागत नाही. आमचं चिन्ह न्यायप्रविष्ठ आहे, असे पृथ्वीवरील कोणत्याही पक्षाला सांगावं लागत नाही, अशी खिल्ली उडवली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT