Prakash Ambedkar : पवार-दाऊद भेटीचा आंबेडकरांकडून पुन्हा दावा; म्हणाले ‘त्या बॉम्बस्फोटाशी संबंध...’
Solapur, 09 November : शरद पवार आणि दाऊद इब्राहिमची भेट झालेली आहे, त्याचा शोध घेतला पाहिजे. देशभरात 1990 ते 2000 च्या दरम्यान अनेक वर्षे ब्लास्ट झाले आहेत. शरद पवार आणि दाऊद भेटीचे काही संबंध आहेत का? हे तपासले पाहिजे. दाऊदचा शोध घेताना तिसऱ्या दिवशी दिल्लीत ब्लास्ट झाला आहे, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांवर पुन्हा केला आहे.
सोलापुरात माध्यमांशी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा शरद पवार (Sharad Pawar) आणि दाऊद भेटीचा पुनरूच्चार केला. ते म्हणाले माझे संबंध सगळ्यांशी आहेत. (देवेंद्र फडणवीस आणि प्रकाश आंबेडकर संबंधावर उत्तर) उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला बघायला आले, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. जयंत पाटील यांनी दाऊद इब्राहिम (Daud Ibrahim) आणि शरद पवार संबंधाबद्दल खुलासा करावा.
बोरा कमिटीची माहिती तुमच्या सोलापूरकराकडेच आहे. सुशीलकुमार शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री होते, त्यामुळे त्यांना विचारा बोरा कमिटीचे अनेक्शन सदनात का ठेवण्यात आली नाही. मी बाबासाहेबांचा नातू असल्याने कुठे लाईन ड्रॉ करतात, हे बाबासाहेबांनीच आम्हाला शिकवलं आहे, असेही प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) स्पष्ट केले.
आंबेडकर म्हणाले, समाज आणि देश असा जेव्हा प्रश्न येतो, तेव्हा देशाचा विचार केला पाहिजे. मुसलमानांमध्ये प्रगल्भता आली का, यावर मी भाष्य करणार नाही. पण, उलेमा यांनी 44 जागांची मागणी केली आहे. उलेमाचं राजकारण आणि त्यांचा दबाव हे मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व मिळावं म्हणून आहे.
राज्यातील 32 मतदारसंघात ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना होत आहे. मुसलमान एकनाथ शिंदे यांना मतदान करू शकणार नाहीत. या 32 ठिकाणी वंचितचे उमेदवार आहेत, त्यांना मुस्लिमांनी मतदान करावे, असे आवाहनही आंबेडकर यांनी केले.
उद्धव ठाकरे गटाचा ’वॉक आउट’
मागच्या पाच वर्षांत भाजपने मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या सर्वांमागे वंचित आघाडी ताकादीने उभे राहिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या खासदारांनी वक्फ बोर्ड बिलाच्या वेळी वॉकआउट केले, त्यामुळे आम्हाला शंका येते.
लोकसभेला भाजपचा पराभव कोणी टाळला
मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण देण्याला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली आहे. मुस्लिम समाजाने वंचित सोबत उभ राहावं. आम्ही अमित शहा यांना फेल केल्याशिवाय राहणार नाही. लोकसभेत संविधान हा प्रश्न होता आणि अंडरकरंट विषय या लोकशाहीत होता. त्यावेळी वंचितने रान पेटवलं. संविधानवादी आणि लोकशाहीवादी फोर्सेस एकत्र आल्या आणि त्यांनी भाजपला हरवता हरवता थांबवलं.
फडणवीसांना माझं चॅलेंज
भाजप आणि काँग्रेस दोघं एकसारखेच आहेत. हिंदू कोडं बिल निर्माण करताना पाहिला विरोधक हिंदू महासभा, आरएसएस आणि साधू संतांना पुढ करण्यात आलं. मात्र, साधूसंतांशी जेव्हा बाबासाहेब बोलले तेव्हा बाबासाहेबांना साधू संतांनी पाठिंबा दिला. देवेंद्र फडणवीस यांना माझं चॅलेंज आहे. संसदेतील संविधानाचा रंग काय आहे, त्यांनी सांगावं. राहुल गांधी जे संविधान घेऊन फिरत आहेत, ते भाजपने प्रिंट केलेले आहे, असा दावाही
आंबेडकरांची सिंधी, मारवाडी समाजाला साद
सिंधी-मारवाडी समाजाला धंदा वाढवायचा असेल, तर त्यांनी भाजपचे प्रेम कमी करायला पाहिजे आणि वंचित बहुजन आघाडीला मतदान केलं पाहिजे, अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सिंधी आणि मारवाडी समाजाला साद घातली आहे.
Edited By : Vijay Dudhale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.