Suresh Khade Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Suresh Khade : फडणवीस यांच्या निर्णयाचा माजी पालकमंत्री खाडेंना फटका, वाय सुरक्षा काढली

Maharashtra Politics : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्याचा निर्णय घेतला. यामुळे शिंदेसेनेच्या आमदारांना मिळणारी वाय दर्जाची सुरक्षा हटवण्यात आली आहे. यामुळे सध्या नाराजी पहायला मिळत आहे.

Aslam Shanedivan

Sangli News : राज्यातील महायुती सरकारने पोलिस दलाकडे असलेले कमी मनुष्यबळाचे कारण देत आमदारांना मिळणारी वाय दर्जाची सुरक्षा हटवली आहे. याचा सर्वाधिक फटका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आमदारांना बसला आहे. त्याच्याकडील सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्यात आली असून आता फक्त एकच बंदुकधारी पोलिस देण्यात येणार आहे. यामुळे सध्या नाराजी पसरली असून सांगलीत देखील भाजपच्या माजी पालकमंत्र्यांची वाय दर्जाची सुरक्षा हटवण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात याची चर्चा सुरू आहे.

राज्य शासनाने मंगळवारी (ता.18) माजी मंत्री, आमदारांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्याचा निर्णय घेतला. गृहमंत्रालय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याने त्यांनी थेट निर्णय घेत सुरक्षा व्यवस्था कमी केली आहे. तर सरकारने पोलिस दलाकडे असलेले कमी मनुष्यबळाचे कारण देत हा निर्णय घेतला आहे. यामुळे माजी पालकमंत्री तथा भाजप आमदार सुरेश खाडे यांचीही सुरक्षा व्यवस्था कमी केली आहे.

भाजप आमदार सुरेश खाडे यांनी पालकमंत्री म्हणून सुत्रे स्विकारल्यापासून त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. पण आता गृहविभागाच्या निर्णयामुळे वाय दर्जाची सुरक्षा कमी करण्यात आली असून आता एक अंगरक्षक देण्यात आला आहे. यामुळे खाडे यांना आता एकाच सुरक्षा रक्षकाला सोबत घेऊन वावरावे लागेल.

महायुती सरकारमध्ये कामगार मंत्री व पालकमंत्री म्हणून खाडे यांच्याकडे सुत्रे आली होती. यावेळी त्यांच्याकडे वाय सुरक्षासह पोलिस वाहनांचा ताफा आणि कर्मचाऱ्यांचा लवाजमा होता. तर नव्या सरकारमध्ये देखील मंत्रिपद मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती. यामुळेच त्यांच्याकडे आतापर्यंत वाय दर्जाची सुरक्षा होती. पण आता ती काढून घेण्यात आली आहे.

यावर आमदार खाडे यांनी, आपली कोणतीही नाराजी नसून सुरक्षा व्यवस्थेचा निर्णय राज्य सरकारचा आहे. तो गृह विभागाचा धोरणात्मक निर्णय असून मुख्यमंत्र्यांनी तो घेतला आहे. जो आपल्याला मान्य असल्याचे आमदार खाडे यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT