Prakash Abitkar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prakash Abitkar: पहिल्यांदाच मंत्री अन् पालकमंत्रिपद मिळालं, आबिटकर यांच्यासमोर आता 'हे' मोठ आव्हान

Mahayuti Challenge: सडेतोड आणि आक्रमकतेमुळे त्यांनी मतदारसंघातील विकास कामांना जोर दिला आहे. पहिल्यांदाच जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाल्यानंतर पालकमंत्री या नात्याने सर्वांना सामावून घेणे आवश्यक आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News 20 jan 2025: विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला मिळालेले यश त्यातून शिवसेनेमध्ये निर्माण झालेली मंत्रिपदाची स्पर्धा, मंत्रीपद मिळाल्यानंतर शिवसेनेतील अंतर्गत नाराजी, ज्येष्ठ नेत्यांना डावलून दिलेले पालकमंत्री, आणि पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याचा अनुभव पाहता आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना महायुतीला एकसंघ राखण्याचं मोठे आव्हान आहे.

पहिल्यांदाच पालकमंत्री पदाची माळ गळ्यात पडल्याने ज्येष्ठ नेते आणि अनुभवी नेत्यांसमोर त्यांचा कस लागणार आहे. शिवाय महायुती जिल्ह्यात एकतर्फी असल्याने विरोधकांना विकास काम करत असताना सोबत घ्यावे लागणार आहे. या सर्वांचा ताळमेळ घालण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात दहा जागांवर महायुतीने यश मिळवले. त्यामध्ये राष्ट्रवादी एक, शिंदेंची शिवसेना चार, जनसुराज्य दोन आणि भाजप दोन अशी विधानसभा सदस्यांची संख्या आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला स्थान मिळणार याची चर्चा अनेक वेळा रंगली. शिंदेंच्या शिवसेनेत राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, राजर्षी शाहू आघाडीचे नेते आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आणि राधानगरीचे आमदार आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यात स्पर्धा होती. राष्ट्रवादीतून एकमेव आमदार असल्याने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे मंत्रीपद निश्चित समजले जात होते.

मंत्रिमंडळ विस्तारात प्रकाश आबिटकर यांना संधी मिळाल्याने राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर नाराज झाले. तर पालकमंत्री निवडी वेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरचे पालकमंत्री देणे डावलले. भाजपकडून उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासाठी आग्रह धरला होता. कोल्हापूरची जबाबदारी प्रकाश आबीटकर यांना मिळाल्यानंतर विरोधाचे एकीमध्ये रूपांतर करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

मंत्रिमंडळात प्रकाश आबिटकर यांना संधी दिल्यानंतर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त उघड केलेली नाराजी, आबिटकर यांच्या स्वागतासाठी शिवसेना आणि भाजपच्या आमदाराने आणि शहरातील पदाधिकाऱ्यांनी फिरवलेली पाठ वरूनच महायुतीतील अंतर्गत नाराजी उघड झाली होती. अशातच पालकमंत्री म्हणून पहिल्यांदाच काम करताना सर्वांना जुळवून घ्यावे लागणार आहे. नियोजन समितीत देखील सर्वच पक्षाचे कार्यकर्ते असल्याने त्यांच्याशी समन्वय साधून निधी वाटपातील नाराजी दूर करण्याचे आव्हान आबिटकर यांच्यासमोर असणार आहे.

आक्रमकतेला येणार मर्यादा

प्रकाश आबिटकर हे राधानगरी मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. मागील दहा वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे विविध प्रश्न मार्गी लागले आहेत. सडेतोड आणि आक्रमकतेमुळे त्यांनी मतदारसंघातील विकास कामांना जोर दिला आहे. पहिल्यांदाच जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाल्यानंतर पालकमंत्री या नात्याने सर्वांना सामावून घेणे आवश्यक आहे. पालकमंत्री म्हणतील त्याच पद्धतीने प्रशासनाला देखील काम करावे लागते. त्यामुळे इथून पुढे आबिटकर यांच्या आक्रमकतेला मर्यादा येणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT