Guardian Minister Post: दोन मंत्री ठरले औटघटकेचे पालकमंत्री; मध्यरात्री महायुतीत खलबत; नेमकं काय घडलं?

Mahayuti Dispute: राज्य सरकारने रायगड आणि नाशिक पालकमंत्रिपदाला स्थगिती दिल्याने या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची माळ कुणाच्या गळात पडणार, याकडे सगळ्याचे लक्ष आहे. 26 जानेवारी पालकमंत्री म्हणून राष्ट्रध्वज कोण फडणवणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
  Guardian Minister Post news
Guardian Minister Post newsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai 20 jan 2025: पालकमंत्रिपदाच्या वाटपावरुन महायुतीतील वाद निर्माण झाला असून अनेक मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शनिवारी रात्री पालकमंत्रिदाचे वाटप करण्यात आले, त्याला 24 तास उलटत असतानाच रविवारी दोन पालकमंत्री हे औटघटकेचे पालकमंत्री ठरले.

राज्य सरकारने रविवारी रात्री उशिरा नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांची निवड रद्द केली. नाशिक आणि रायगड पालकमंत्रिपदाला स्थगिती दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. महायुतील सारे काही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. येत्या 26 जानेवारी पालकमंत्री म्हणून राष्ट्रध्वज कोण फडणवणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

  Guardian Minister Post news
Political News Update : डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ!

राज्य सरकारने शनिवारी रात्री राज्य सरकारने पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली, यात अनेक मंत्र्यांना पालकमंत्रिपदापासून वंचित ठेवण्यात आले होते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पालकमंत्रिपदाच्या जबाबदाऱ्यांचे वाटप करताना भाजपच्या सर्व मंत्र्यांचा पालकमंत्रिपद देत महायुतीत पुन्हा आपली ताकद दाखवून दिली.

भाजपचे 20 मंत्री आहेत. त्यापैकी मंगलप्रभात लोढा आणि माधुरी मिसाळ हे सहपालकमंत्री तर उर्वरित सर्व पालकमंत्री म्हणून काम पाहणार आहेत. शिवसेनेचे मंत्रिमंडळात दोन राज्यमंत्र्यांसह 12 मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे 11 मंत्री आहेत. शिवसेनेचे भरत गोगावले, दादा भुसे आणि योगेश कदम यांना पालकमंत्रिपद देण्यात आलेले नाही. तर राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे, धनंजय मुंडे हे कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनाही वगळण्यात आले आहे.

  Guardian Minister Post news
BJP Sankalp patra: महिलांना 2500 रुपये महिना, होळी-दिवाळीमध्ये मोफत सिलेंडर; BJP च्या संकल्प पत्रात गेमचेंजर घोषणा

महायुतीतील पालकमंत्रिपदवरून वाद चव्हाट्यावर आला असताना राज्य सरकारने रायगड आणि नाशिक पालकमंत्रिपदाला स्थगिती दिल्याने या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची माळ कुणाच्या गळात पडणार, याकडे सगळ्याचे लक्ष आहे.

आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रिपद देण्याला गोगावले यांचा तर नाशिकमध्ये गिरीश महाजन यांना पालकमंत्रिपद दिल्याने दादा भुसे यांना नाराज आहेत. त्यानंतर रविवारी रात्री महायुतीत मोठ्या घडामोडी घडल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे आणि मुंबई शहरचं पालकमंत्रिपद दिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com