Minister Shambhuraj Desai responding sharply to Mangal Prabhat Lodha’s remarks, stressing the role of the 2022 Shinde revolt in strengthening BJP and reshaping Maharashtra politics. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shambhuraj Desai : भाजप ताकदवान कसे झाले? लोढांच्या विधानावर मंत्री देसाई संतापले...

MangalPrabhat Lodha : मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्यावर शंभुराज देसाई यांनी जोरदार प्रतिक्रिया देत शिंदे उठावामुळे भाजप सत्तेत आल्याचे सांगितले. 2014–2022 मधील राजकीय स्थित्यंतरांचीही त्यांनी आठवण करून दिली.

हेमंत पवार - Hemant Pawar

Mahayuti politics : भाजप देवाभाऊमय आहे, तर महाराष्ट्रातील इतर पक्ष कसे चालतील हे देवाभाऊ ठरवतात, असे वक्तव्य भाजप नेते मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी जोरदार प्रहार केला. एकनाथ शिंदे यांनी 2022 ला जी उठावाची भूमिका घेतली त्यामुळे भाजप सत्तेत आले आणि चांगला वाटा मिळाला. 2019 मध्ये आम्हाला सत्तेतून बाहेर जाण्याची गरज नव्हती.

शिवसेना भाजप युती भक्कम करण्यासाठी आम्ही सत्तेतून बाहेर पडलो. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात महायुतीला यश मिळाले आणि भाजप ताकदवान झाले याचा मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गांभीर्याने विचार करावा, असे सुनावले.

दूरचित्रवाहिन्यांवर मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे व्यक्तव्य मी ऐकले. त्यांनी 2014 पर्यंत राज्यात भाजप ताकदवान नव्हती हे त्यांनी स्विकारले आहे सध्या भाजप ताकदवान आहे. त्यांचे विधानसभेला जास्त आमदार निवडून आले ही वस्तुस्थिती आहे असे सांगून मंत्री देसाई म्हणाले, 2014 नंतर महाराष्ट्रात राजकीय स्थित्यंतरे घडली, त्याकडेही मंत्री लोढा यांनी पाठीमागे वळून पाहिले पाहिजे.

2014 ते 2019 राज्यात भाजप व शिवसेनेचे सरकार होते. तेव्हा काय वस्तुस्थिती होती हे सर्वांनी पाहिले आहे. 2019 नंतर राज्यात महाविकास आघाडी झाली. त्यानंतर भाजप विरोधात बसली आणि उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर आघाडी करून सरकार बनवले.

नंतरच्या काळात आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी कडक भूमिका घेतली. 2022 ला शिवसेनेच्या 50 आमदारांनी उठाव केला. तेथून खऱ्या अर्थाने राज्याच्या राजकीय परिस्थितीत स्थित्यंतर झाले. सत्तेच्या बाहेर असणारे भाजप आमचे नेते शिंदे यांच्या या निर्णयाने पुन्हा सत्तेत आली. महायुतीचे मुख्यमंत्री म्हणुन एकनाथ शिंदे यांनी राज्यात अडीच वर्षे काम केले. शिंदे यांच्या मंत्रीमंडळात आम्ही होतो. कोणताही निर्णय घेताना तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारल्याशिवाय, चर्चा केल्याशिवाय घेतला नाही.

महायुती भक्कम करण्याचे काम शिंदे यांनीच केले. शिंदे यांची कामाची गती, निर्णयक्षमता यामुळे महायुतीला 2024 च्या विधानसभेत मोठे यश मिळाले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीला महाविकास आघाडी कडुन फेक नेरेटीव्ह सेट केला गेला. त्याचा फायदा काही प्रमाणात महाविकास आघाडीला झाला. मात्र लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी झोकून देवून काम केले.

त्यामुळे शिवसेनेमार्फत (Shivsena) 80 जागा लढलो त्यातील 61 जागा जिंकता आल्या. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, एक रुपयात पिक विमा योजना, महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत, बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण योजना अशा सर्व क्षेत्रातील लोकांसाठी भरीव काम शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT