Kolhapur News: नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमुळं युती आणि आघाडींचं गोंधळ सगळीकडं पाहायला मिळतो आहे. कट्टर प्रतिस्पर्धी असलेले स्थानिक नेतेही यानिमित्त एकत्र येताना दिसत आहेत. अशीच एक प्रतिस्पर्ध्यांची युती कोल्हापुरातील कागलमध्ये झाली आहे. यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे हसन मुश्रीम आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते समरजितसिंह घाटगे हे कट्टर विरोधक एकत्र आले आहेत.
पण हे दोघे एकत्र आल्यानं माजी खासदार संजय मंडलीक मात्र चांगलेच भडकले आहेत. त्यांनी मुश्रीम आणि घाटगेंची युती झाल्यापासून सातत्यानं दोघांवर टीका सुरु केली आहे. आपला पराभव करण्यात या दोघांचा हात असल्याचं ते वारंवार सांगत आहेत. त्यांचं शांत होण्याची चिन्ह नसल्यानं आता हसन मुश्रीफांनी मंडलिकांना इशारा दिला आहे. 'मी तोंड उघडलं तर बात दूर दूर तक जायेगी' अशा शब्दांत मुश्रीफांनी महाडिकांना इशारा दिली आहे.
कागल नगरपरिषदेच्या निवडणुकीनिमित्त मुश्रीफ आणि घाटगे हे ११ वर्षांच्या संघर्षानंतर एकत्र आले आहेत. यावरुन संजय मंडलिक म्हणाले की, मुश्रीफ हे पैसा आणि सत्ता यांच्या जोरावर विरोधी उमेदवारांनी माघार घ्यावी म्हणून दबाव आणत आहेत. तसंच ईडीच्या कचाट्यातून सुटण्यासाठी मुश्रीफांनी आणि जमिनीच्या घोटाळ्यातून सुटण्यासाठी घाटगे यांनी युती केल्याचाही आरोप मंडलिक यांनी केला आहे. तसंच कागलची जनता योग्य तो निर्णय घेईल, असंही संजय मंडलिक यांनी म्हटलं आहे.
यावर उत्तर देताना मुश्रीफ म्हणाले की, ११ वर्षांच्या संघर्षानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनं माझी आणि घाटगे यांची युती झाली. आता अकरा वर्षानंतर जर या तालुक्यात आणि जिल्ह्यात शांतता लाभवी यासाठी आम्ही दोघांनी युती केली. हा तालुक्याच्या जनतेच्या भल्यासाठी आणि विकासासाठी युती आहे. आता आमच्याविरोधात संजय मंडलीक यांनी जे उमेदवार उभे केले आहेत. हे सर्वजण हंबीरवाडा कारखान्याचे कर्मचारी आहेत. यामध्ये त्यांच्या पत्नी, मुलगी यांचा समावेश आहे, त्यांचा या कर्मचाऱ्यांवरही विश्वास राहिलेला नाही. काल आमची एक सुनबाई बिनविरोध निवडून आल्या, पण त्यांच्याविरोधात असलेल्या तरुणीनं स्वतः सांगितलं की मी मुश्रीफांच्या कामावर आनंद व्यक्त करण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी उमेदवारी मागे घेतली आहे. मग यामध्ये पैसा आणि सत्तेचा काय संबंध आला.
संजय मंडलिकांचं अज्ञान आहे, ईडीकडून माझी कोर्टाकडून निर्देश मुक्तता कधीच झालेली आहे. सध्या कोर्टात माझी जवळपास एकही केस नाही, यापूर्वी देखील माझ्यावर आरोप झाले होते. त्यामुळं मंडलिकांच्या आरोपांप्रमाणं ईडीच्या कारवाईपासून सुटण्यासाठी युती करण्याची मला गरज नव्हती. तसंच समरजीतसिंह घाटगे यांनी जमिनीवरील आरक्षण उठवण्यासाठी युती केल्याचे आरोप निराधार आहेत. त्यांच्या तालुक्यात अशा अनेक जमिनी आहेत त्यामुळं केवळ त्यासाठी ते युतीचा निर्णय घेणार नाहीत. पण तालुक्याच्या भल्यासाठी त्यावेळी खासदार सदाशिवराव मंडलिक आणि विक्रमसिंह घाटगे यांनी घेतला होता. त्यांच्याही दहा वर्षांच्या संघर्षानंतर त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, कागलच्या जनतेच्या कलाबाबत मंडलिकांनी केलेल्या विधानाला उत्तर देताना मुश्रीफ म्हणाले, योग्य तो निर्णय जनता घेणारच आहे. आता त्यांची जी भूमिका आहे त्याचा फायदा आम्ही मंडलिकांना होऊ देणार नाही. त्यांना लोकसभेला आम्ही इतका चांगला प्रचार करुन त्यांना मताधिक्य मिळवून देऊन सुद्धा त्यांनी परवा विधान केलं की आम्ही दोघांनीही त्यांचा विरोधात प्रचार केला. २००९च्या निवडणुकीचा दाखलाही त्यांनी दिला. त्यावेळी सदाशिवराव मंडलिकांच्या पाठीमागे जनता जशी उभी राहिली तशीच जनता आता संजय मंडलिकांच्या मागे पण उभी राहील. पण सदाशिवराव मंडलिक यांचं काम किती, त्यातुलनेत आता मी संजय मंडलिकांबाबत बोलायला लागलो तर बात दूर दूर तक जाएगी, मी त्या व्यक्तीवर टीका करणार नाही. कारण त्यांनी आपलं तोंड आवरावं आणि त्यांनी सांभाळून बोलावं अशी माझी त्यांना आजही विनंती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.