Sharad Pawar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar: CM पदावरुन शरद पवार यांनी MVAच्या नेत्यांचे टोचले कान

Who Will be CM face of opposition MVA Sharad Pawar made clear: उद्धव ठाकरे, काँग्रेसकडूनही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांची नावे देखील चर्चेत आहेत.

Mangesh Mahale

मुख्यमंत्री पदावरुन महाविकास आघाडीचे एकमत अद्याप झाले नाही, तीनही पक्षातील पदाधिकारी आपल्या नेत्यांचे नाव पुढे करीत या पदावर दावा ठोकत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच आघाडीकडून मुख्यमंत्रीपदी कोण असेल यांचे नाव जाहीर करावे, अशी मागणी आघाडीतील काही नेत्यांनी केली आहे.

शरद पवारांनी (Sharad Pawar)सीएम पदावरून आघाडीच्या नेत्यांचे कान टोचले. अजून कशात काहीच नाही, आधी लवकरच जागा वाटप पूर्ण करा, असा सल्ला त्यांनी दिला. मुख्यमंत्रिपदासाठी महाविकास आघाडीमध्ये अनेकजण इच्छुक आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून वारंवार मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याची घोषणा केली जावी, अशी मागणी केली जातेय.

उद्धव ठाकरेसुद्धा मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत, असे ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी अनेकवेळा सांगितले आहे. काँग्रेसकडूनही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांची नावे देखील चर्चेत आहेत.

महायुती आणि महाविकास आघाडीत सीएमच्या उमेदवारांवरून वाद होण्याची शक्यता आहे. एकीकडे ठाकरे गट मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सीएम पदा संदर्भात काही दिवसापूर्वी मोठं विधान केलं आहे. जयंत पाटलांच्या विधानामुळे मविआत अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे.

शरद पवार यांनी यांनी यापूर्वी सीएम पदावर अनेकवेळा भाष्य केले आहे. 'जे काही असेल ते निवडणुकीनंतर होईल,' असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री चेहऱ्याबाबत आताच आग्रह धरण्यात काही अर्थ नाही. मुख्यमंत्रीपदाबाबतीत महाविकास आघाडी एकत्र बसून निर्णय घेईल. आकड्यांच्या आधारावर विधानसभा निवडणुकीननंतर कोण मुख्यमंत्री होणार हे ठरणार आहे असं शरद पवारांनी हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT