Sharad Pawar: देशाचा गृहमंत्री भाषण काय करतो? शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर लक्ष ठेवा,पक्ष फोडा...; पवारांचा शहांवर पलटवार

Sharad Pawar reacts on Amit Shah Speech: लाडकी बहीण योजनेतून तिला अर्थसहाय्य करायचं दुसरीकडे तिच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष करायचं हे सुरू आहे.लाडकी बहीण योजनेमुळे इतर योजनांचे अर्थसहाय्य थांबले आहे.
amit shah sharad pawar
amit shah, sharad pawarsarkarnama
Published on
Updated on

भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा नुकताच महाराष्ट्र दौरा झाला. अमित शहांनी (Amit Shah) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्याला शरद पवारांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

अमित शाह सध्या काहीही बोलत असतात. देशाचा गृहमंत्री भाषण काय करतो? शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर लक्ष ठेवा, पक्ष फोडा, असे ते सांगतात. त्यांनी कायदा व सुव्यवस्था कोठे नेऊन ठेवली आहे? असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. सांगली येथे पवार माध्यमांशी बोलत होते.

महाराष्ट्रात अनेक वेळा अमित शाह येतात, यावर पवार यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता, पवारांनी पत्रकारांची फिरकी घेतली. "त्यांची सासरवाडी कोल्हापुरात असल्याने ते सारखे महाराष्ट्रांच्या दौऱ्यावर येत असावे, असा टोला पवारांनी लगावला.

amit shah sharad pawar
NCP Vs BJP : कोल्हापूर पाठोपाठ सांगलीतही पवारांचा भाजपला 'जोर का झटका'; माजी आमदारानं कमळ सोडलं, तुतारीवर लढणार...?

लाडकी बहीण योजनेच्या निधीवरुन त्यांनी प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, "सरकारने लाडकी लेक योजना काढली, या योजनेते सर्वांना स्वागत केले. पण मुलींवर वाढलेले अत्याचार हे गंभीर आहे. लाडकी बहीण योजनेतून तिला अर्थसहाय्य करायचं दुसरीकडे तिच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष करायचं हे सुरू आहे.

लाडकी बहीण योजनेमुळे इतर योजनांचे अर्थसहाय्य थांबले आहे. कॅन्सर हॉस्पिटलमधील सरकारी अर्थसहाय्य थांबले आहे. हे वैद्यकीय क्षेत्राचे उदाहरण आहे. अशा अनेक योजनांचे पैसे थांबले आहेत, असे पवार यांनी सांगितले.

amit shah sharad pawar
SambhajiRaje Chhatrapati: शाहू महाराजांना निवडून आणण्यात माझा वाटा किती? हे सतेज पाटलांना विचारा!

संभाजीराजे, राजू शेट्टी, बच्चू कडू ह तिसरी आघाडी करण्याच्या तयारीत आहेत. यावर पवारांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली. "ते एकत्र आले तर परिणाम होणारच, आम्ही खूप अस्वस्थ झालोय, आमच्या झोपा उडाल्या आहेत," असा टोला पवारांनी लगावला. वंचित विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनाही त्यांनी चिमटा काढला. पवार म्हणाले, "ज्यांना एक सुद्धा जागा मिळत नाही, त्यांनी इतरांबद्दल भाष्य करणं कितपत योग्य आहे? मीडियामध्ये नाव येण्यासाठी हे सर्व बोलत असतात,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com