शारदीय नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती (SambhajiRaje Chhatrapati) यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. खासदार शाहू महाराज छत्रपती (MP Shahu Maharaj) यांच्याबाबत प्रश्न विचारत असताना माध्यमांवर संभाजी राजे चांगलेच भडकले.
तुम्हाला नेहमी मला अडचणीत आणायचा आहे. स्वराज्य पक्ष लोकसभेलाच निवडणूक रिंगणात उतरणार होता. पण छत्रपती शाहू महाराज निवडणूक रिंगणात उतरले. त्यामुळे मी थांबलो. शाहू महाराजांना निवडून आणण्यात माझा वाटा आहे, तो किती आहे, हे सतेज पाटील हेच सांगू शकतील, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापुरात दिली.
महाराष्ट्र स्वराज पक्षाची स्थापना तीन दिवसांपूर्वी झाली आहे. स्वराज्य संघटना म्हणून आम्ही यापूर्वी पुढे जात होतो, पण आता मात्र स्वराज्य पक्ष म्हणून आम्ही पुढे जात आहोत. स्वराज्य पक्षाचे पहिलं आंदोलन हे अरबी समुद्रात शिवस्मारक झाले आहे का? हे पाहण्यासाठी आहे. 11 तारखेला महाराष्ट्र स्वराज्य पक्ष स्वराज्य पक्षाचे लॉन्चिंग पुण्यात करणार आहे. त्यानंतर नाशिक, नांदेड आणि महाराष्ट्र दौरा असेल, अशी माहिती संभाजीराजे यांनी दिली.
महाशक्तीच्या माध्यमातून बहुतांश 288 जागा लढण्याचा आमचा मानस आहे. थोड्या दिवसात परत बैठक होईल. त्यानंतर सविस्तर पद्धतीने कुठे कुठे कोणी लढायचं हे ठरेल. कोल्हापुरातील प्रमुख दोन नेत्यांचा तिसऱ्या आघाडीत सामावेश आहे. अजूनही कोणतीही सविस्तर चर्चा झालेली नाही. आम्ही एकत्र बसू आणि आमची लाईन ठरवू. 288 मतदारसंघात आमचे उमेदवारी कसे देता येईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचा संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात सुरक्षा व्यवस्था अतिशय वाईट पद्धतीने ढासळत चालली आहे. या महाराष्ट्राकडे आम्ही आदर्श म्हणून पाहायचो. या महाराष्ट्राला शिवाजी महाराज आणि इतर संतांचा वारसा आहे. अशा महाराष्ट्रात अशा घटना घडत आहेत हे वेदनादायी. सरकार यासंदर्भात का गंभीर नाही याबाबत मोठा प्रश्न असल्याचा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केला.
शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्याबाबत बोलताना, भिडेंचे वाक्य मी ऐकले नाही, पण जबाबदार व्यक्तींनी जबाबदार पद्धतीने वक्तव्य करावीत, असे सांगत लक्ष्मण हाके यांच्याबाबत भूमिका स्पष्ट केली. आज नवरात्र आहे. कोणाच्या बद्दल मी चर्चा करावी कोणाबद्दल बोलावं याला काही मला मर्यादा आहेत. 1947 ला राजेपण संपले आहे. मी संभाजी भोसले आहे मी संभाजी छत्रपती आहे. असा टोला त्यांनी लगावला.
जरांगे यांचा उद्देश आणि माझा उद्देश एकच आहे. त्यामुळे त्यांनी पाडापाडीपेक्षा आपले उमेदवार कसे निवडून आणता येईल हे पाहावे .पाडापाडीची भूमिका घेऊ नका, असं मी वडीलधारी व्यक्ती म्हणून मनोज जरांगे यांना सांगितले आहे. जरांगे यांच्यासमोर दोन पर्याय आहेत, एक आमच्या सोबत येणं आणि दुसरे स्वतंत्र लढणे.
माझा चंद्रकांतदादा पाटील यांना एक प्रश्न आहे, तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन केले. मग जलपूजनापूर्वी का सर्व परवानगी आणल्या नाहीत? तुम्ही परवानगी न घेता जलपूजन कसं काय केले ? तुम्ही आता म्हणू नका संभाजीराजे यांनी सर्व परवानग्या घेऊन द्याव्यात," असंही ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.