Education Department officials review the list of unauthorized schools in Maharashtra as strict action begins against illegal institutions. The crackdown on unauthorized schools has alerted parents across the state. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Education Department Action : पालकांनो, अलर्ट रहा! शिक्षण आयुक्त अ‍ॅक्शन मोडवर! राज्यात 111 शाळांविरोधात गुन्हा दाखल

Unauthorized Schools Maharashtra : शालेय विभागाकडून करण्यात आलेल्या तपासणीतून राज्यात सुमारे ४८७ अनधिकृत शाळा असल्याचे समोर आले आहे. सर्वाधिक अनधिकृत शाळा मुंबई विभागात आहेत. शिक्षण विभागाने ३२५ शाळांवर केलेल्या दंडात्मक कारवाईपैकी केवळ १६ प्रकरणातच दंडवसुली झाली आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News, 11 May : राज्यात शालेय विभागातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या माहितीमुळे शिक्षण आयुक्त ॲक्शन मोडवर आले आहेत. राज्यात तब्बल 487 शाळा या अनाधिकृत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालकांना आता शहा निशा करूनच पाल्यांच्या प्रवेशासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

तर या प्रकरणामुळे यावर्षीपासून शालेय विभागाकडून वर्षातून दोन वेळा अनाधिकृत शाळांची घोषणा होणार आहे. शिवाय महापालिका, जिल्हा परिषदेला जिल्ह्यातील अधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध करण्याची सूचना शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली आहे.

शालेय विभागाकडून करण्यात आलेल्या तपासणीतून राज्यात सुमारे ४८७ अनधिकृत शाळा असल्याचे समोर आले आहे. सर्वाधिक अनधिकृत शाळा मुंबई विभागात आहेत. शिक्षण विभागाने ३२५ शाळांवर केलेल्या दंडात्मक कारवाईपैकी केवळ १६ प्रकरणातच दंडवसुली झाली आहे.

राज्यातील अनधिकृत शाळांपैकी ७६ शाळा बंद करण्यात आल्या आहेत. १११ शाळांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वाधिक शाळा या मुंबई विभागातून आहेत. या विभागात तब्बल 379 शाळा अनधिकृत असून आतापर्यंत ५९ शाळा बंद करण्यात आल्या आहेत. तर, ९६ शाळांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या पाठोपाठ कोल्हापूर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी देखील अनाधिकृत शाळा असल्याचे उघड झाले आहे. मात्र या शाळेविरोधात अद्याप कारवाई केलेली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या संस्थांवर अद्याप कारवाई का झाली नाही असा सवाल देखील उपस्थित होत आहे. दरम्यान पुणे विभागात देखील ६३ अनधिकृत शाळांपैकी ११ शाळा बंद करण्यात आल्या आहेत. सात शाळांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अनाधिकृत शाळेच्या आकडेवारी ही मागील दोन महिन्यापूर्वीची आहे. या दोन महिन्यात अनेक बदल झालेले असू शकतात. मात्र यानंतर देखील ज्या अनाधिकृत शाळा आढळून येतील त्यावर कारवाई केली जाईल, जिल्हानिहाय तपासणी वाढविण्यात येईल. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी अनधिकृत शाळांवरील कारवाईची मोहीम तीव्र करण्यावर भर देण्यात येईल, अशी प्रतिक्रिया आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT