Harshvardhan Sapkal: मोदींच्या आवाहनानंतर; सपकाळ भडकले! त्याग जनतेने करायचा अन् मोदी फक्त भाषणं देत फिरणार?

Harshvardhan Sapkal Slams PM Modi: महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे, … आणि मोदी अजूनही फक्त इव्हेंटबाजी, फोटोशूट आणि प्रचारसभांमध्ये व्यस्त आहेत, असे सपकाळ यांनी म्हटले आहे.
Harshvardhan Sapkal Slams PM Modi
Harshvardhan Sapkal Slams PM ModiSarkarnama
Published on
Updated on

Narendra Modi petrol appeal News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पेट्रोलियम उत्पादनांचा जपून वापर करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनानंतर यावर आता विरोधकांकडून तीव्र शब्दात प्रतिक्रिया येण्यास सुरवात झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोदींच्या या धोरणावर सडकून टीका केली आहे.

हैदराबाद येथे ९,४०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदी बोलत होते. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून इंधनाचे दर वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

देशात इंधन आणि LPG गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे, महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे, अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे… आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अजूनही फक्त इव्हेंटबाजी, फोटोशूट आणि प्रचारसभांमध्ये व्यस्त आहेत, असे सपकाळ यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे.

Harshvardhan Sapkal Slams PM Modi
Maharashtra Teacher News: जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण अचानक पुढे ढकलले; शिक्षकांना मोठा दिलासा

जेव्हा जगातील इतर देश संभाव्य संकटासाठी नियोजन आणि तयारी करत होते, तेव्हा मोदी आणि भाजप फक्त निवडणुका, जाहिराती, धर्मांधता आणि द्वेषाचे राजकारण करण्यात मग्न होते. राहुल गांधी सतत इशारे देत होते, पण सत्तेच्या अहंकारात बुडालेल्या मोदी सरकारने देशाला थेट संकटाच्या खाईत ढकलले, अशा शब्दात सपकाळ यांनी मोदींच्या धोरणावर भाष्य केले आहे.

Harshvardhan Sapkal Slams PM Modi
Balbharati Textbooks: बालभारतीची पुस्तके बदलणार! पालकांनो, जुनी पुस्तके घेताना सावध राहा!

कोविड काळात लोक ऑक्सिजनअभावी मरत होते आणि हे टाळ्या-थाळ्या वाजवण्याचे कार्यक्रम करत होते. आज अर्थव्यवस्था कोसळत असताना जनतेला काटकसर शिकवली जात आहे. मोदींच्या निष्काळजीपणाची, अहंकारी कारभाराची आणि फसव्या प्रचारराजकारणाची किंमत आज देशातील प्रत्येक सामान्य नागरिक भरतो आहे. देशाला दूरदृष्टी असलेला नेता हवा होता, पण देशाच्या माथी फक्त एक ‘इव्हेंट मॅनेजर’ मारला गेला, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com