Rupali Chakankar : खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांवर SIT कडून 45 प्रश्नांचा मारा; स्वत: IPS तेजस्वी सातपुते यांनी विचारले प्रश्न..

Rupali Chakankar SIT inquiry : रुपाली चाकणकरांना एसआयटी पथकाने काल चौकशीसाठी नाशिक येथे पाचारण केले होते. भोंदू अशोक खरात प्रकरणात तब्बल साडे पाच सात त्यांची चौकशी करण्यात आली.
Ashok kharat Kaka Koyte Rupali Chakankar .jpg
Ashok kharat Kaka Koyte Rupali Chakankar .jpgSarkarnama
Published on
Updated on

Ashok Kharat case Nashik : भोंदू अशोक खरात प्रकरणात SIT च्या पथकाने राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास कसून चौकशी केली. नाशिकमधील महाराष्ट्र पोलिस अॅकडमी येथे एसआयटी कार्यालयात रविवारी (दि.१०) चाकणकर यांची चौकशी करण्यात आली.

खरातवर दाखल महिला लैंगिक अत्याचारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांसह बेहिशेबी मालमत्तेसंदर्भात SIT च्या पथकाने रूपाली चाकणकर यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. तब्बल साडेपाच तास चाललेल्या चौकशीत पथकाने सुमारे 45 पेक्षा अधिक प्रश्न चाकणकर यांना विचारले. एसआयटीच्या प्रमुख महिला आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांनी स्वत: चाकणकर यांना प्रश्न विचारले. याशिवाय सहायक पोलिस आयुक्त अमोल भारती यांनीही चौकशी केली.

रूपाली चाकणकर यांची भोंदू खरात याच्याशी कधी ओळख झाली?

शिवनिका संस्थानवर त्यांनी किती वर्षे विश्वस्त म्हणून काम पाहिले?

संस्थानच्या आर्थिक व्यवहारांची त्यांना किती माहिती आहे?

खरातला भेटण्यासाठी कोणकोणते राजकीय नेते आले?

त्यांनी कोणत्या स्वरूपाच्या पूजाविधी केल्या?

चाकणकर यांचे खरातसोबतचे व्हायरल झालेले फोटो-व्हिडिओ कधीचे?

त्या करीत असलेल्या पूजाविधी कोणत्या?

त्या पूजाविधी कशासाठी केल्या?

खरातच्या आर्थिक व्यवहारांशी त्यांचा काय संबंध?

खरातच्या प्रकरणात चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा गैरवापर केला का?

अशा प्रकारचे ४५ हुन अधिक प्रश्न चाकणकर यांना विचारण्यात आले?

Ashok kharat Kaka Koyte Rupali Chakankar .jpg
Rupali Chakankar : "होय मी खरात आणि त्याच्या पत्नीला गुरू मानलं होतं..."; SIT चौकशीत चाकणकरांची कबुली, नेमकं काय म्हणाल्या?

चाकणकर या खरातच्या मिरगाव येथील शिवनिका ट्रस्टवर विश्वस्त आहेत. खरातला ते आपला गुरु मानत. चाकणकर यांना खरातची पाद्यपुजा करतानाचे फोटो व व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दबावातून आपल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर याप्रकरणात चाकणकर यांची SIT ने चौकशी करावी अशी मागणी जोर धरु लागली होती. रूपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांची यापूर्वीच शिर्डी पोलिसांनी खरातशी असलेल्या आर्थिक गैरव्यवहारांशी कसून चौकशी केली आहे. त्यापाठोपाठ रूपाली चाकणकर यांना नोटीस बजावत एसआयटीने काल त्यांची चौकशी केली. चाकणकर काल पुण्याहून आपल्या महिला वकिलांसह नाशिकमध्ये आल्या होत्या. चौकशीनंतर त्या पुन्हा पुण्याच्या दिशेने रवाना झाला.

Ashok kharat Kaka Koyte Rupali Chakankar .jpg
Rupali Chakankar : नाशिकमध्ये रुपाली चाकणकरांची SIT कडून कसून चौकशी ; त्यापूर्वी माध्यमांचा गरडा अन् पहिली प्रतिक्रिया

त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी बोलताना एसआयटी प्रकरणात चौकशीसाठी उपस्थित राहून त्यांच्या प्रश्नांची आपण समाधानकारक उत्तरे दिली दिल्याचे सांगितले. मात्र, चाकणकर यांनी त्या महिला आयोगाच्या अध्यक्षा असताना खरातला वाचविण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप होत आहे. त्यादृष्टीने एसआयटीला तपास करताना काही पुरावे मिळाल्याचे समजते. त्याअनुषंगाने चाकणकर यांची कसून चौकशी करण्यात आली असली तरी त्याबाबत त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळालेली नाहीत. त्यामुळे येत्या काळात त्यांच्या अडचणीत आणखी भर पडण्याचीच शक्यता असून, त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com