Prithviraj Chavan, Narendra Modi sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Tata Airbus : मोदींच्या हस्तक्षेपामुळे महाराष्ट्राची बाजू लंगडी पडलीय...

पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan म्हणाले,''गेल्या अनेक वर्षात राज्यात State मोठा प्रकल्प Big Project नाही. हे दुर्दैव आहे. एअरबसबाबत Airbus Project प्रकल्प गुजरातला Gujrat जाणार हे स्पष्ट झालं आहे.

Umesh Bambare-Patil

सातारा : एअरबस प्रकल्प गुजरातला जाणार हे स्पष्ट झाले आहे. आतपर्यंतच्या कोणत्याच पंतप्रधानांनी आपलं राज्य, आपलं शहर असा दुराग्रह केला नाही. कारण ते देशाचे पंतप्रधान असतात. आता मोदी जे करत आहेत ते दुर्भाग्यपूर्ण असून त्यांच्या हस्तक्षेपामुळे महाराष्ट्राची बाजू लंगडी पडली आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

राज्यातून वेदांता-फॉक्सफॉनपाठोपाठ आता टाटा समूहाचा एअरबस प्रकल्प गुजरातला गेला आहे. महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. एअरबस प्रकल्पावरून विरोधकांकडून शिंदे, फडणवीस सरकारसह मोदींवरही जोरदार टीका होत आहे. या प्रकल्पावरून काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,''गेल्या अनेक वर्षात राज्यात मोठा प्रकल्प नाही. हे दुर्दैव आहे. एअरबसबाबत प्रकल्प गुजरातला जाणार हे स्पष्ट झालं आहे. आतापर्यंत कोणत्याच पंतप्रधान यांनी आपलं राज्य, आपलं शहर असा दुराग्रह केला नाही. कारण ते देशाचे पंतप्रधान असतात. पण, आता मोदी जे करत आहेत. ते दुर्भाग्यपूर्ण आहे'.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हस्तक्षेप हा तीव्र आहे. त्यामुळे महाराष्ट्राची राज्याची बाजू लंगडी पडत आहे. प्रकल्प देशात येतोय, याचं स्वागत केलं पाहिजे. पण, यात पंतप्रधान किंवा जवळच्या नेत्यांनी अधिकाऱ्यांनी एका राज्याच्या विरोधात हस्तक्षेप करण उचित नाही. याबाबत सर्वपक्षीय बैठक घ्यावी, असेही श्री. चव्हाण म्हणाले.

माजी मंत्री बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील संघर्षावर भाष्य करताना श्री. चव्हाण म्हणाले, 'शिंदे सरकारला विस्तार करता येत नाही. कुणाला काय आश्वासन दिली होती. त्यामुळे सरकार काम करू शकत नसल्याने ओढाताण सुरू आहे. ही महाराष्ट्र राज्याची बदनामी आहे. सरकार किती दिवस चालेल याची काळजी सगळ्यांना आहे. पण अंतर्गत विरोध मूळ राज्याचे प्रश्न सुटत नाही'.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT