Bhogavati Education Board Election Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Bhogavati Education Board Election : कोल्हापुरातून महाआघाडीसाठी मोठी बातमी; भोगावती शिक्षण मंडळाच्या निवडणुकीत पुन्हा मारली बाजी

Mahavikas Aghadi News : भोगावती शिक्षण मंडळाच्या एकूण 13 जागांसाठी 26 उमेदवारांमध्ये झालेल्या लढतीत सत्ताधारी गटाच्या बारा उमेदवारांनी दणदणीत विजय मिळविला आहे. विरोधी गटाचे संजय कलिकते हे एकमेव उमेदवार विजयी झाले आहेत.

Rahul Gadkar

Kolhapur, 04 February : कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या भोगावती शिक्षण प्रसारक मंडळावर सत्ताधाऱ्यांनी पुन्हा एकदा वर्चस्व मिळवले आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, माजी आमदार संपतराव पवार, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे, जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक ए. वाय. पाटील या महाविकास आघाडी नेत्याच्या नेतृत्वाखालील सत्तारुढ राजर्षी शाहू शिक्षण सेवा आघाडीने १३ पैकी १२ जागांवर विजय मिळविला आहे. विरोधी पॅनेलमधील दादासाहेब पाटील-कौलवकर शिवशाही आघाडीला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे, त्यांच्या या निवडणुकीत दारूण पराभव झाला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून खोळंबलेल्या आणि ह्या ना त्या कारणाने स्थगित झालेली भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची (Bhogavati Education Board) निवडणूक पार पडली. दोन दिवसांपूर्वी मतदान झाल्यानंतर आज (ता. 04 फेब्रुवारी) मतमोजणी पार पडली आहे.

भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या एकूण १३ जागांसाठी २६ उमेदवारांमध्ये झालेल्या लढतीत सत्ताधारी गटाच्या बारा उमेदवारांनी दणदणीत विजय मिळविला आहे. विरोधी गटाचे संजय कलिकते हे एकमेव उमेदवार विजयी झाले आहेत. निवडणूक (Election) निर्णय अधिकारी म्हणून अरुण भुईबर व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रागिणी खडके यांनी काम पाहिले.

रात्री उशिरापर्यंत ही मतमोजणी सुरू होती. पहाटे तीनपर्यंत संपूर्ण मतमोजणी पार पडली. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीतील दोन उमेदवार या शिक्षण मंडळाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस ए. वाय. पाटील, काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील विजयी झाले आहेत.

काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या जोडण्या या निवडणुकीत महत्वाच्या होत्या. सत्ताधारी राजर्षी शाहू शिक्षण सेवा आघाडीचे मताधिक्य कमी करण्यात यश आले असले तरी विजयाच्या टप्प्यापर्यंत ही आघाडी पोहोचू शकलेली नाही, त्यामुळे राजर्षी शाहू आघाडीने विजयाला गवसणी घातली आहे.

भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीतील शाहू शिक्षण सेवा आघाडीचे विजय उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते

  • राजेंद्र आडके...............11303

  • बाजीराव चौगुले..............11835

  • बाजीराव लहू चौगुले..........11510

  • अभिषेक डोंगरे..................11642

  • समरसिंह पवार..................11463

  • प्रमोद पाटील.....................11615

  • मोहन पाटील.................... 11865

  • राजाराम पाटील.................11342

  • रोहित पाटील....................11480

  • सुभाष पाटील....................11750

  • शिवाजी भाट....................11872

  • एकनाथ वरुटे...................10125

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT