Kolhapur News : भोगावती शिक्षण मंडळाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले! वादाची परंपरा यंदा खंडित होणार का?

Bhogavati education shikshan prasarak mandal election : निवडणूक निर्णय अधिकारी अरुण भुईवर यांनी भोगावती शिक्षण मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
bhogavati-education-shikshan-prasarak-mandal
bhogavati-education-shikshan-prasarak-mandalSarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर जिल्ह्यातील शालेय राजकारणातील महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या भोगावती शिक्षण मंडळाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. नेहमीच या निवडणुकीत वादाची परंपरा यंदा खंडित होणार का याबाबतची चर्चा देखील होऊ लागली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अरुण भुईवर यांनी भोगावती शिक्षण मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

10 जानेवारी पासून या प्रक्रियेला सुरुवात होणार असून दोन फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. परत 3 फेब्रुवारी रोजी या निवडणुकीची मतमोजणी होणार असल्याची माहिती भुईवर यांनी दिली आहे. सातत्याने वादाच्या भोवऱ्यात राहून शालेय राजकारणाच्या पटलावर असलेल्या भोगावती शिक्षण मंडळाची पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

bhogavati-education-shikshan-prasarak-mandal
Local Body Election : आमदार - खासदारांना बळ देणारी नवी पिढी राजकारणाच्या वाटेवर; स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नशीब आजमावणार

दरवर्षी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये असलेली ईर्षा निवडणुकीच्या निमित्ताने समाजासमोर येते. शिक्षकांमध्येच सुरू असलेली रस्सीखेच यानिमित्ताने जिल्ह्यात पाहायला मिळते. सहा ते सात जानेवारीपर्यंत मतदार यादीवर हरकत घेतली जाणार आहे. 9 जानेवारी रोजी मतदार यादीवर शिक्कामोर्तब केला जाणार आहे. येत्या 10 जानेवारीपासून या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

10 जानेवारी पासून नामनिर्देशन पत्राचे वाटप होणार आहे. 10 जानेवारी ते 14 जानेवारीपर्यंत नामनिर्देशक पत्राचे वाटप केले जाणार आहे आणि स्वीकारले जाणार आहे. 15 जानेवारी रोजी नामनिर्देशन पत्राची यादी जाहीर केली जाणार आहे. 16 ते 17 जानेवारीपर्यंत या अर्जांची छाननी केली जाणार असून 20 जानेवारी रोजी पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. 21 ते 23 जानेवारीपर्यंत अर्ज माघारीची मुदत असणार आहे. तर 24 जानेवारी रोजी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होणार असून त्याच दिवशी चिन्ह वाटप होणार आहे.

bhogavati-education-shikshan-prasarak-mandal
Bharat Gogawale Video : तपश्चर्या फळाला आली, मीच रायगडचा पालकमंत्री! गोगावलेंनी ठणकावून सांगितलं

वादाच्या भोवऱ्यात का होते भोगावती शिक्षण मंडळाची निवडणूक

करवीर तालुक्यातील परिते येथील भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यमान संचालकांनी धर्मादाय उपायुक्त व सभासदांना विश्वासात न घेता त्याच संचालकांना मुदतवाढ दाखवली. तसा खोटा बदली अर्ज क्र. 439/22 ने धर्मादाय उपायुक्तांकडे मंजुरीसाठी दाखल केला होता. याविरुध्द उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, संचालिका सौ. पुष्पा पाटील व सभासद राजेंद्र आडके यांनी हरकत घेतली होती. हा वाद धर्मादाय उपायुक्तासह उच्च न्यायालयामध्येसुद्धा 3 वर्षांपासून सुरु होता. त्यामुळे 2021 पासून या शिक्षण मंडळाच्या निवडणुकीचा मार्ग रखडला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com