Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. कार्यकर्त्यांच्या नजरा मुंबईकडे लागल्या आहेत. जिल्ह्यातील दहाही जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये मंत्रीपदावरून चांगलीच रस्सीखेच निर्माण झाली आहे.
एकीकडे कार्यकर्त्यांमध्ये इर्षा लागून राहिले असताना भावाच्या मंत्रिपदासाठी मोठ्या बंधूंनी आपापल्या परीने फिल्डिंग लावली आहे. तर अनेकांनी दिल्ली मुंबईत तळ ठोकून वरिष्ठ नेत्यांना मनवण्याची भूमिका घेतली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दोन कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद मिळू शकते. राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ यांचे कॅबिनेट मंत्री पद निश्चित समजले जाते. तर दुसरीकडे शिवसेनेला एक कॅबिनेट मिळण्याची शक्यता आहे.
शिवसेनेकडून राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. तर भाजपकडून आमदार अमल महाडिक यांचे नाव आघाडीवर आहे. भावाच्याच वाट्याला मंत्रिपद आणण्यासाठी मोठ्या भावाची कसरत सुरू आहे. दहा दिवसांपासून या बंधूनी मुंबईतच ठोकला आहे.
भाजपकडून राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक हे अमल महाडिक यांच्यासाठी मंत्रिपद आणण्यासाठी आग्रही आहेत. संसदीय अधिवेशनासाठी ते दिल्लीत आहेत. मात्र दिल्लीतूनच त्यांनी फिल्डिंग लावली आहे. शिवाय मुंबईत देखील काही नेत्यांच्या भेटी घेऊन मंत्रिपदासाठी आग्रही असल्याचं दाखवून दिले आहे.
शिवसेनेकडून राजर्षी शाहू आघाडीचे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे आघाडी सरकारच्या काळात मंत्रिपदावर होते. महायुतीमध्ये देखील मंत्रिपद मिळवण्यासाठी त्यांचे बंधू संजय यड्रावकर हे देखील मुंबईत तळ ठोकून आहेत. व्यक्तिगत त्यांच्या पातळीवर त्यांनी नेत्यांच्या भेटीगाठी सुरू ठेवल्या आहेत.
करवीर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर त्यांचे बंधू अजित नरके हेदेखील मंत्रिपदासाठी बिल्डिंग लावत आहेत. दहा दिवसांपासून ते मुंबईतच असून बंधू चंद्रदीप नरके यांच्यासाठी मंत्रिपदासाठी जोडण्या लावताना दिसत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.