Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावमधील वातावरण तापलं; समितीच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड, पाच ठिकाणी जमावबंदी, ठाकरेंच्या शिवसैनिकांना रोखलं

Karnataka-Maharashtra Border Dispute : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मराठी भाषिकांच्या महामेळाव्याच्या तोंडावर संचारबंदीचा आदेश कर्नाटक पोलिसांनी काढत पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू केली आहे.
Maharashtra Ekikaran Samiti
Maharashtra Ekikaran Samiti Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या मराठी भाषिक महामेळाव्यावरून राजकारण तापलं आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बेळगाव भागातील सीमेवर पोलिस बंदोबस्तात वाढ केलीय.

कर्नाटक पोलिसांनी बेळगावमध्ये संचारबंदी लागू केली असून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड चालू केल्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटलेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यावरून आक्रमक झाले आहेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उदय सामंत आणि काही पदाधिकारी बेळगावला जाणार असल्याची घोषणेवर संजय राऊत यांनी टीका केली आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीने आज बेळगावमध्ये मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित केला आहे. याच दरम्यान इथं कर्नाटक सरकारचे विधिमंडळ अधिवेशन आहे. मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारने परवानगी दिलेली नाही. उलट, कर्नाटक पोलिसांनी (Police) महामेळाव्याच्या परिसर भागात संचारबंदी लागू केली आहे. तसंच एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू केली आहे. कर्नाटक पोलिसांच्या या भूमिकेचे महाराष्ट्रात पडसाद उमटू लागले आहे.

Maharashtra Ekikaran Samiti
ShivSena Politics : मुंबई महापालिकेसाठी ठाकरेंची फिल्डिंग; संघटना बांधणीचा हा आहे 'प्लॅन'

शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिकांनी बेळगावकडे रवाना झालेत. या पदाधिकाऱ्यांची वाहने पोलिसांनी अडवले असून, त्यांना पुढं पाठवलं जात नाही. यामुळे शिवसैनिक आक्रमक झालेत. महाराष्ट्रातील पोलिसांनी देखील सीमा भागात बंदोबस्त वाढवला आहे. बेळगावच्या धर्मवीर संभाजी चौक इथं सोमवारी सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी धर्मवीर संभाजी चौक, छत्रपती संभाजी उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, लेले ग्राउंड, व्हॅक्सिन डेपो, अशा पाच ठिकाणी जमाव बंदीचा आदेश लागू केला आहे.

Maharashtra Ekikaran Samiti
Ambadas Danve : नगरसेवक ते विरोधी पक्षनेते, असा आहे अंबादास दानवेंचा राजकीय प्रवास

एकीकरण समितीचे नेते आर.एम.चौगुले यांनी महाराष्ट्रात जाण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत. महाराष्ट्रात गेल्यावरच हे आंदोलन बंद होईल. यापूर्वी देखील अनेकदा पोलिसांमार्फत आमच्यावर दबाव आणला गेला. कायद्याचा धाक दाखवला गेला. कायद्याला पुढं करत आता अटक केली जात आहे. ताब्यात घेतलं जात आहे. नजरकैदीत ठेवलं जात आहे. परंतु आंदोलनाला कितीही आडकाठी आणली तरी आता माघार घेणार नाही. कोणत्याही परिस्थितीत सोमवारी आम्ही महामेळावा होणार, असे सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातील नेते उदय सामंत यांनी मी आणि काही पदाधिकारी बेळगावमध्ये जाणार असल्याची घोषणा केली आहे. त्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. "एकनाथ शिंदे कधीही बेळगाव गेले नाहीत. मंत्री असताना शिंदे यांच्याकडे सीमाभागाची विशेष जबाबदारी होती. अटक होईल, या भीतीने ते कधीही बेळगावला गेले नाहीत.

शिंदेंनी कधीही बेळगावमधील मराठी जनतेकडे पाहिले नाही. कर्नाटकमध्ये काँग्रेसचे राज्य आहे, ही पळवाट नाही, असे सांगून बेळगावमधील मराठी भाषिकांच्या मागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ठामपणे उभा आहे आणि तिथं आमचे शिवसैनिक महामेळाव्यात सहभागी होतील, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com