Mahesh shinde, Shashikant shinde
Mahesh shinde, Shashikant shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

वाढदिनीच शशीकांत शिंदेंना महेश शिंदेंनी दिला धक्का; जिहे-कटापूरचे केले जलपूजन

सरकारनामा ब्युरो

विसापूर : खटाव तालुक्याच्या दुष्काळी भागासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या जिहे- कटापुर योजनेचे पाणी सोमवारी सायंकाळी नेर तलावात पोचले. या पाण्याचे पूजन आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते आज सकाळी सात वाजता झाले. त्यावेळी त्यांचे समर्थक आणि खटाव व कोरेगाव तालुक्यातील ग्रामस्थ उपस्थित होते. आमदार शशिकांत शिंदे यांच्या वाढदिनीच त्यांचे राजकीय विरोधक महेश शिंदे यांनी जिहे- कटापुर योजनेच्या पाण्याचे पूजन अर्थात उद्‌घाटन समारंभ घेऊन एकप्रकारे आमदार शशिकांत शिंदें यांना भल्या पहाटे धक्का दिल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती.

१९९५ मध्ये मंजूर झालेल्या या जिहे- कटापुर योजनेचा फायदा हा खटाव तालुक्यातील दुष्काळी भागाला मोठ्याप्रमाणात होणार असल्याने या भागातील शेतकरी या योजनेकडे डोळे लावून बसले होते. अखेर २६ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर नेर तलावात पाणी आल्याने शेतकरी वर्गात प्रचंड आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, पुसेगाव येथे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, आमदार महेश शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस रणजितसिंह देशमुख, पंचायत समितीच्या सदस्या निलादेवी जाधव, महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती वैशालीताई फडतरे यांच्या हस्ते श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीस जिहे कठापूरच्या पाण्याने जलाभिषेक करण्यात आला. तसेच या पाण्याचा कलश भागातील प्रत्येक गावात दिले गेले असून, त्याचा ग्रामदैवतास अभिषेक करण्यात येणार आहे.

राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद आमदार शशीकांत शिंदे यांचा आज वाढदिवस असून त्यांच्या वाढदिनीच त्यांचे राजकिय विरोधक महेश शिंदे यांनी जिहे-कठापूरचे पाणी नेर तलावात दाखल झाले. या पाण्याचे जलपूजन करून आमदार शशीकांत शिंदेंना भल्या पहाटे धक्का दिल्याची चर्चा यावेळी उपस्थितांत रंगली होती. यावेळी बोलताना आमदार महेश शिंदे म्हणाले, गेली दहा वर्षे जलसंपदा मंत्रीपद हे सातारा जिल्ह्याकडे होते. या दहा वर्षात या योजनेचे कसलेही काम झाले नव्हते. तसेच या योजनेचे काम कधीच होऊ शकणार नाही, असे आम्हाला सांगण्यात आले होते.

पण, याला गती मिळाली ती जाखणगावला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आले होते. त्यावेळी त्यांना आम्ही त्यांना नरेंद्र मोदींचे गुरू लक्ष्मणराव इनामदार यांचा हा भाग आहे. ही योजना पूर्णत्वास गेल्याशिवाय काहीही होणार नाही. या योजनेची सुप्रमा व जलआयोगाच्या मान्यता घेणे गरजचे आहे, असे सांगितले होते. त्यानंतर आम्ही लक्ष्मणराव इनामदार यांच्या नावाने ट्रस्टची स्थापन केला. त्या माध्यमातून आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

श्री. मोदींनी केंद्रीय जल आयोगाची मान्यता दिली. त्यानंतरच या योजनेला खर्च करण्याची मुभा मिळाली. २००४ ते २०१४ पर्यंत कोणताही निधी या योजनेसाठी खर्ची पडला नव्हता. सगळीकडे अतिवृष्टी होत असताना आम्ही मात्र, टँकरने पाणी देत होतो. पण ही योजना आमच्या भागासाठी फलदायी असून आता सरकारने दुष्काळी योजनांसाठी विजेचे दर कमी करावेत, अशी आमची मागणी आहे.

जिहे कठापूरला होणार सोलार पॉवर प्रोजेक्ट

जून २०१९ मध्ये तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती. त्यावेळी आम्ही हा विषय मांडला होता. आता जिहे कठापूर योजनेला सोलार योजना जाहीर केलेली आहे. भविष्यात या योजनेसाठी ३८ मेगावॅटचा सोलार पावर प्रोजेक्ट उभारला जाणार आहे. यातून अगदी माफक दरात या योजनेचे पाणी मिळणार आहे, असेही आमदार शिंदे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT