MLA Mahesh Shinde
MLA Mahesh Shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Koregaon News: महेश शिंदेंचे प्रयत्न; कोरेगावसाठी अर्थसंकल्‍पातून ११४ कोटींचा निधी

Umesh Bambare-Patil

-Pandurang Barge

Koregaon News : राज्याच्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार महेश शिंदे MLA Mahesh Shinde यांच्या प्रयत्नामुळे कोरेगाव Koregaon विधानसभा मतदारसंघातील प्रमुख जिल्हा मार्गांसाठी ५६ कोटी ५० लाख, ग्रामीण व इतर जिल्हा मार्गांसाठी २५ कोटी आणि कोरेगावातील नवीन शासकीय विश्रामगृहासाठी सात कोटी रुपये मंजूर असा सुमारे ११४ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.

प्रमुख जिल्हा मार्गांसाठी सातारा तालुक्यात २७ कोटी ७५ लाख, कोरेगाव तालुक्यात १९ कोटी ५० लाख, खटाव तालुक्यात नऊ कोटी २५ लाख रुपये असे एकूण ५६ कोटी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामध्ये सोनगाव-खिंडवाडी-कोडोली-संगम माहुली-प्रतापसिंहनगर -खेड-सदरबझार-सातारा या रस्त्यामध्ये प्रतापसिंहनगर ते खेड ग्रामपंचायत या दरम्यानसाठी दहा कोटी.

मर्ढे -लिंब- बसाप्पाचीवाडी-आरळे-पाटखळ-वाढे-म्हसवे-वर्ये- नेले- धावडशी- आकले रस्त्यापैकी मर्ढे ते कृष्णा नदी पुलापर्यंतसाठी पाच कोटी रुपये, पुणे-बंगळुरु महामार्ग ते म्हसवे गावापर्यंतच्या रस्त्यासाठी तीन कोटी ७० लाख रुपये, वडूथ-क्षेत्रमाहुली रस्त्यामध्ये बोरखळ, सोनगाव संमत निंब येथे ट्रिमिक्स कॉंक्रीटीकरणासाठी पाच कोटी रुपये, रेणावळे शिव ते आरळे स्वागत कमान या दरम्यान रस्त्यासाठी तीन कोटी २५ लाख रुपये.

बोरखळ येथे लहान पुलाच्या जोड रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी ८० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ग्रामीण व इतर जिल्हा मार्गासाठी सातारा तालुक्यात पाच कोटी २५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी सातारा रेल्वे स्टेशन-महागाव-चिंचणेर संमत निंब- चिंचणेर वंदन-निगडी रस्त्यासाठी तीन कोटी रुपये, तासगाव पोहोच रस्त्यासाठी एक कोटी ५० लाख रुपये, बोरखळ ते जरंडेश्‍वर पायथा रस्त्यासाठी ७५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

कोरेगाव तालुक्यात १७ कोटी २५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. बनवडी-देऊर -बिचुकले रस्त्यासाठी सात कोटी रुपये, भाडळे ते धनगरवाडी रस्त्यासाठी एक कोटी ५० लाख रुपये, राज्य मार्ग ते भाकरवाडी रस्त्यासाठी एक कोटी ५० लाख रुपये, बोबडेवाडी जोड रस्त्यासाठी एक कोटी ५० लाख रुपये, कुमठे- गोळेवाडी-सुलतानवाडी- एकसळ रस्त्यासाठी गोळेवाडी गावात एक कोटी ५० लाख रुपये.

पळशी ते किन्हई रस्त्यासाठी एक कोटी रुपये, आसगाव ते तडवळे संमत कोरेगाव रस्त्यासाठी ७० लाख रुपये, कुमठे ते ल्हासुर्णे रस्त्यासाठी ७० लाख रुपये, चिमणगाव ते भंडारमाची रस्त्यासाठी ९० लाख रुपये, प्रमुख जिल्हा मार्ग ते विठ्ठलवाडी रस्त्यासाठी ६० लाख रुपये, पाडळी ते जरंडेश्‍वर पायथा रस्त्यासाठी ६० लाख रुपये व ल्हासुर्णे-भिवडी रस्त्यामध्ये मंगळापूर गावासाठी २५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

खटाव तालुक्यात दोन कोटी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले असून, त्यापैकी राज्य मार्ग ते धावडदरे रस्त्यासाठी एक कोटी रुपये, राज्य मार्ग ते ललगुण-नेर रस्त्यासाठी नेर गावात कॉंक्रीट रस्त्यासह बांधकामासह रस्त्यासाठी एक कोटी रुपये व पठाण वस्ती ते भोसरे गाव रस्त्यासाठी ५० लाख रुपये असे एकूण २५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

कोरेगावात नवीन विश्रामगृह

कोरेगाव शहरात राष्ट्रीय महामार्गालगत ब्रिटीशकालीन शासकीय विश्रामगृह असून, त्याला १०९ वर्षे होऊन गेली आहेत. ब्रिटीशकालीन स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असलेली ही इमारत आहे अशीच ठेवून रिकाम्या जागेत नवीन विश्रामगृह उभारले जाणार आहे. त्यासाठी सात कोटी ७४ लाख नऊ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT