Satara News : कणखर उदयनराजेही गहिवरले; जनता दरबार सुरु असताना आजींची हजेरी, अन्...

Chhatrapati Udayanraje Bhosale : खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे साताऱ्यात असल्यानंतर दररोज जनता दरबार भरतो.
Chhatrapati Udayanraje Bhosale News
Chhatrapati Udayanraje Bhosale NewsSarkarnama

Satara News : खासदार छत्रपती उदयनराजे (Chhatrapati Udayanraje Bhosale) भोसले हे साताऱ्यात असल्यानंतर दररोज जनता दरबार भरतो. त्यांना भेटण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. असा एक ह्दयस्पर्शी क्षण नुकताच उदयनराजे भोसले यांच्या जनता दरबारात घडला.

उदयनराजेंचा दिलदार स्वभाव त्यांच्या अनेक गोष्टीतून नियमित पाहायला मिळतो. उदयनराजे यांचे अनेक किस्से लोक नियमित सांगत असतात. असाच एक प्रसंग उदयनराजे यांच्या कार्यालयात घडला. उदयनराजे यांचा जनता दरबार सुरु असताना तेथे एक आजीबाई आल्या. त्यांनी उदयनराजे यांना आशीर्वाद दिले. त्यामुळे उदयनराजेही थोडे गहिवरले, त्यांनी आजींना नमस्कार केला. आजींना त्यांच्या डोक्यावर हात ठेऊन त्यांना आशीर्वाद दिले.

Chhatrapati Udayanraje Bhosale News
Satara : खासदारांचे पेटिंग हा बालिशपणाचा कळस; समर्थकांना आवर घाला : शिवेंद्रसिंहराजे

निस्सीम प्रेम करणाऱ्या तळागाळातील लोकांचे आशीर्वाद आणि खंबीर पाठिंबामुळे उदयनराजे भोसले यांचाही ऊर भरून आला. हे फोटो उदयनराजे यांनी आपल्या ट्वीटर आणि फेसबुक पेजवरुन पोस्ट केले आहेत. त्यावर अनेक नागरिकांनी प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.

या फोटोखाली अनेक नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की ''असे प्रेम सगळ्यांनाच मिळते असे नाही. ज्यांना हे मिळाले ते खरच धन्य! कारण राजकारण म्हटले की खुर्ची आणि पैसा हेच सध्याचे समीकरण आहे. मात्र, उदयनराजे त्या पेक्षा खूप वेगळे आहेत, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Chhatrapati Udayanraje Bhosale News
Kasba Election : जातीयवादी पक्षांना रोखण्याचा 'महाविकास'चा प्रयोग यशस्वी...

हे फोटो पोस्ट करताना उदयनराजे यांनी लिहिले आहे, की ''आम्हाला नियमित भेटणाऱ्या नागरिकांपैकी एक आजी आज भेटायला आल्या. आमची आस्थेने विचारपूस करून काळजी घेण्याचा सल्ला दिला. माझ्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या प्रेमळ लोकांचे आशीर्वाद व खंबीर साथ माझ्या पाठीशी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. असेच आशीर्वाद मिळत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com