MD Drugs Case Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur MD Action : चंदगडच्या हाजगोळीमध्ये MD बनवणाऱ्या कारखान्यावर मोठी कारवाई; तब्बल 100 कोटी किमतीचे एमडी जप्त

MD Action: चंदगड तालुक्यातून तयार होणारे हे घातक ड्रग्ज मुंबई, पुणे, गोवा तसेच कर्नाटक (बंगळूर) सारख्या मोठ्या शहरांमधील ड्रग्ज पेडलर्सना आणि तरुणाईला पुरवले जात असल्याची धक्कादायक बाब यापूर्वीही तपासात समोर आली आहे.

Deepak Kulkarni

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील हाजगोळी येथे MD ड्रग्स बनवणाऱ्या कारखान्यावर महाराष्ट्र अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स, पुणे पथकाने मोठी कारवाई केलीये. या कारवाईत तब्बल 100 कोटी किंमतीचे 50 किलो MD जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत असून अद्याप अधिकृत किती साठा सापडला याची माहिती नाही. मात्र 6 जणांना ताब्यात घेतले आहे.

विशेष म्हणजे, ग्रामीण आणि सीमावर्ती भागात हा ड्रग्स निर्मितीचा कारखाना सुरू असल्याचे समोर आले आहे. कारवाईदरम्यान MD तयार करण्यासाठी लागणारे विविध साहित्य आणि रसायनेही जप्त करण्यात आली आहेत. सीमावर्ती भागात सुरू असलेल्या या अवैध ड्रग्स निर्मितीमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

या कारखान्यामागे नेमके कोण आहेत, याचा तपास अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून सुरू आहे. कारखान्यातून MD निर्मितीसाठी वापरले जात असलेले विविध कंटेनर, काचेची उपकरणे, वजनकाटे, इलेक्ट्रिक हिटर, मिक्सर, ड्रिलसदृश मशीन आणि मोठ्या प्रमाणात इतर साहित्य जप्त करण्यात आले असल्याची माहिती मिळाली असून त्याचा फोटो पुढारी न्यूजच्या हाती लागला. यावर अधिकृतपणे संबंधित विभागाकडून अध्याप माहिती मिळणे अपेक्षित आहे...

चंदगड तालुक्यातून तयार होणारे हे घातक ड्रग्ज मुंबई, पुणे, गोवा तसेच कर्नाटक (बंगळूर) सारख्या मोठ्या शहरांमधील ड्रग्ज पेडलर्सना आणि तरुणाईला पुरवले जात असल्याची साखळी तपासात समोर आली आहे.

यापूर्वी डिसेंबर 2025 कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात एका फार्महाऊस/पोल्ट्री शेडमध्ये मुंबई पोलिसांच्या पथकाने एमडी ड्रग्स तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला होता, ज्यामध्ये कोटींचा माल व आरोपींना अटक झाली होती. यावेळी बंगळूर येथे ड्रग्ज फॅक्टरीचे तीन कारखाने नवी मुंबई येथील अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने उद्ध्वस्त केले होते. यामध्ये 56 कोटी 88 लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज व मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात अंमली पदार्थांविरोधात झालेली ही एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक कारवाई केली होती. दुर्गम ग्रामीण भागाचा गैरफायदा घेऊन सुरू असलेल्या अशा बेकायदेशीर कारखान्यांवर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे छापे टाकून त्यांचा पर्दाफाश केला होता.

या गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी मुख्य रस्त्यांपासून दूर, दुर्गम भागात शेळीपालन, कुक्कुटपालन (पोल्ट्री शेड) किंवा फार्महाऊसच्या नावाखाली हे ड्रग्ज बनवण्याचे कारखाने छुप्या पद्धतीने चालवत असल्याचे तपासात उघड झाले होते.

त्या कारवाईत पोलिसांना मोठ्या प्रमाणावर तयार एमडी ड्रग्ज, ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारे द्रव स्वरूपातील कच्चे रसायन आणि अत्याधुनिक यंत्रसामग्री हाती लागली होती. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT