MD Drugs News : मानवत पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 15 लाखांचे एमडी ड्रग्स पकडले; दोघांना अटक!

MD Drugs Police Two Arrested : संशयीतांची झडती घेतली असता अलीम शेख याच्याकडून 52 ग्राम 38 मिलिग्रॅम एमडी हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आले.
MD Drugs Case
MD Drugs CaseSarkarnama
Published on
Updated on

Parbhani crime News : अंमली पदार्थांचा विळखा मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना बसल्याचे यापूर्वी झालेल्या कारवायांमधून समोर आले आहे. विशेषता लातूर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांच्या विक्री आणि सेवन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा दंडुका उगारला होता.

अंमली पदार्थांच्या गेलेले तरुण आणि विद्यार्थी यांचे भवितव्य लक्षात घेता अमली पदार्थ विरोधी विशेष पथक व पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून नियमित शोध मोहीम राबवली जाते.

मानवत पोलिसांनी तालुक्यातील रत्नापूर शिवारात धाड टाकत तब्बल 14 लाख 64 हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित एमडी (मेफेड्रोन) हा अंमली पदार्थ जप्त केला. या कारवाईत दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.

मानवत पोलीस ठाण्यात या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीचे धागेदोरे आणखी किती खोलवर गेले आहेत याचा कसून तपास पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी पहाटे मानवत पाथरी राष्ट्रीय महामार्गावर रत्नपुर शिवारातील मारुती मंदिरासमोर ही कारवाई करण्यात आली. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून आली शेख खाजा (राहणार नायरा पेट्रोल पंपा जवळ पाथरी), शाहरुख फिरोज खान पठाण (राहणार रविवार पेठ अंबाजोगाई) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

MD Drugs Case
Pune Police : बुधवार पेठेतील 'त्या' गल्लीत पोलिसांनीच मांडला वसुलीचा धंदा? 'तोडपाणी' करणाऱ्या पोलिसांवर मोठी कारवाई!

संशयितांची झडती घेतली असता अलीम शेख याच्याकडून 52 ग्राम 38 मिलिग्रॅम एमडी हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. बाजारात त्याची किंमत दहा लाख 47 हजार 600 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर शाहरुख पठाण याच्याकडून 20 g 84 मिलिग्रॅम एमडी जप्त करण्यात आले त्याची किंमत चार लाख 16 हजार आठशे रुपये असल्याचे समजते याशिवाय एमएच-12 इ एम -9137 क्रमांकाची दुचाकी पोलिसांनी संशयीतांकडून जप्त केली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खिल्लारे हे करीत आहेत. या कारवाईनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्व देत असे सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्शनी शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

MD Drugs Case
Pune Crime : पुण्यात १ कोटींच्या दरोड्याचा प्लॅन, दोन पोलिसांनी तोतया पत्रकारासह आखला डाव; CCTV मुळे भांडाफोड!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com