

Pune News : लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या पुण्यातील छात्रों की गूंज या कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरू होती. अखेर शनिवारी(ता.22) पुण्यात हा कार्यक्रम महिला,तरुणी, विद्यार्थिनींनी मोठा सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे या कार्यक्रमात काही तरुणींनी गांधी यांच्याशी संवादही साधला. याच कार्यक्रमात त्यांनी मोठं विधान केलं आहे.
राहुल गांधी पुण्यातील छात्रों की गूंज कार्यक्रमात म्हणाले, लोक मला वारंवार प्रश्न विचारतात की, भारताची सर्वात मोठी ताकद काय आहे? यावर तुम्हाला विविध उत्तरे दिली जातील. त्यात कुणी आपली अर्थव्यवस्था, सैन्य, वैद्यकीय क्षेत्र, तर काही नागरिक असंही सांगतील. मात्र, भारताची सर्वात मोठी ताकद काय याविषयी माझं स्पष्ट मत आहे की, आपली सर्वात मोठी ताकद ही 70 कोटी महिलांच्या कल्पना, स्वप्नं आहे.
तसेच देशात 70 कोटी पुरूष असूनही 70 कोटी महिलाचं महत्त्व का आहे? तर त्याबाबत माझं उत्तर असं आहे की, महिला नैसर्गिकरित्या जास्त सेन्सेटिव्ह, जास्त जेंटल असतात आणि त्यांना पुरूषांच्या तुलनेत जास्त सहानुभूती असते. त्यामुळेच मला विश्वास आहे की, महिला म्हणजे त्यात विद्यार्थिनी, तरूणी, गृहिणी, वृद्ध या सर्वजणी भारताची ताकद असल्याचं मत राहुल गांधी यांनी म्हटलं.
याच कार्यक्रमात राहुल गांधींनी देशातील महिला, तरुणींबाबतच्या काही धक्कादायक बाबीही मांडल्या. त्यात महिलांवरील अत्याचार, विनयभंग, आकडेच मांडले. देशातील महिलांची स्थिती गंभीर असल्याचे त्यांनी या आकडेवारीतून सांगितले. तसेच देशात 100 पैकी सहा महिलांवर अत्याचार होत असल्याचा दावाही त्यांनी केला.
दरवर्षी साडेचार लाख स्त्रीभूण हत्या होत असल्याचंही राहुल गांधी यावेळी म्हणाले. तसेच कौटुंबिक नियंत्रण, आर्थिक हिंसाचार, लग्नाबाबतची वयोमर्यादा, शिक्षणाबाबतची पालकांची मानसिकता यांसह शाळा, कॉलेज,नोकरीचं ठिकाण, हॉटेल, अशा विविध ठिकाणी अनेक महिलांना त्रासाला सामोरे जावे लागते, असंही राहुल गांधी म्हणाले.
देशात सध्याच्या घडीला तब्बल 84 टक्के महिलांना काम करण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. पुरुषांपेक्षा महिलांना 25 टक्के पगार कमी मिळत असल्याचं खळबळजनक विधानही त्यांनी करत महिलांच्या आर्थिक सन्मानाचा मुद्दाही यावेळी उपस्थित केला. समाजात मोठ्या प्रमाणात महिलांबाबत अत्याचार आणि हिंसाचाराच्या घटना घडताना दिसून येत असल्याचंही काँग्रेस नेते राहुल गांधी या पुण्यातील कार्यक्रमात म्हटलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.