Jaykumar Gore, Makrand Patil
Jaykumar Gore, Makrand Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

APMC Election : वाईच्या आमदारांना रावणाप्रमाणे अहंभाव; लोणंद बाजार समितीत परिवर्तन घडवा...जयकुमार गोरे

Umesh Bambare-Patil

-रमेश धायगुडे

Lonand APMC Election : पुराणातील रावणाने अहंभावामुळे देवाशीच लढून स्वतःचा सर्वनाश करून घेतला. त्याच प्रकारचा अहंभाव वाईच्या आमदारांना Makrand Patil झाला आहे. मी व माझे कुटुंब म्हणजेच सर्वकाही या अविर्भावात वावरणाऱ्या वाईच्या आमदारांना लोणंद बाजार समितीच्या निवडणुकीत परिवर्तन घडवून धडा शिकवा, असे आवाहन आमदार जयकुमार गोरे Jaykumar Gore यांनी केले.

लोणंद बाजार समितीच्या निवडणूक रिंगणातील भाजप-शिवसेना, कॉँग्रेस व अन्य पक्षाच्या महायुतीच्या ‘शेतकरी विकास परिवर्तन पॅनेल’च्या प्रचारानिमित्त पारगाव येथे आयोजित प्रचार सभेत आमदार गोरे बोलत होते.

आमदार गोरे म्हणाले, ‘‘लोणंद बाजार समितीच्या निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे. त्याचा अंदाज आल्यानेच सभेला आलो. खंडाळ्यात सर्व पक्षांनी एकत्र येऊन राज्यात एक आगळीवेगळी महायुती स्थापन केली आहे. येथील जनतेने उशिरा का होईना; पण हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे ही निवडणूक खऱ्या अर्थाने खंडाळ्याच्या अस्मितेची, स्वाभिमानाची, तालुक्याच्या विकासाची, पाणी प्रश्नांची लढाई आहे.’’

नीरा- देवघरचे खंडाळ्याच्या वाट्याचे पाणी राजरोसपणे बारामतीला पळवले जात असेल, तर येथील शेतकऱ्याचा विकास होणार कसा? असा सवाल उपस्थित करून आमदार गोरे म्हणाले, ‘‘यामध्ये चूक आमदारांची नाही, तर येथील जनतेची आहे. डोळ्यादेखत पाणी पळवले जाते तरी त्याच आमदारांना मते दिली जातात. हे घडते कसे? इतकी सोशिकता येते कोठून? शेतीच्या पाण्याबाबत कॉम्प्रमाईज करू नका.

एका कुटुंबाची जहागिरी नसते, शरद पवारांनी भाकरी फिरवण्याचे खंडाळ्यासाठीचे सांगितले आहे. त्यासाठी परिवर्तन घडवा. अत्यंत कष्टाने उभा राहिलेला खंडाळ्याचा साखर कारखाना बारामतीच्या घशात जाणार नाही, यासाठी सावध राहा. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा अधिक दोषी असतो.

जनतेने नेत्याला धाकात ठेवले तर नेत्याला माज मस्ती येत नाही. ही बाब लक्षात घेऊन खंडाळ्यात परिवर्तन घडवून नवा इतिहास रचा. जिल्हा बँकेच्या अध्यक्षांनी सोसायटीच्या नादाला लागू नये, अन्यथा बँकही कामाला लावू. दमदाट्या करून दहशतवादाच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचे थांबवा.’’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT