Solapur, 28 April : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सोसायटी मतदारसंघातील तब्बल 11 जागांच्या बळावर भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे यांच्या पॅनेल सत्ता मिळविण्यात पुन्हा एकदा यशस्वी ठरला आहे. ग्रामपंचायत मतदारसंघात सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने तीन जागा जिंकून प्रथमच बाजार समितीत खाते उघडले आहे. मात्र, सत्ता मिळविण्यात देशमुखांना पुन्हा एकदा अपयश आले आहे.
माने-कल्याणशेट्टी-हसापुरे पॅनेलने सहकारी संस्थांतील अकरा, ग्रामपंचायतमधील एक आणि हमाल तोलार मतदारसंघातील एक अशा तेरा जागा जिंकत विजय मिळविला आहे. विरोधी सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) गटाला तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे, व्यापारी मतदारसंघातून दोन अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत.
मागील 2017 च्या निवडणुकीतही सुभाष देशमुख हे विरोधातच होते. त्यांच्या विरोधात भाजपचे विजयकुमार देशमुख, दिलीप माने, सुरेश हसापुरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बळीराम साठे यांचे पॅनेल होते. मागील निवडणुकीत देशमुख, दिलीप माने (Dilip Mane), साठेंच्या पॅनेलने सर्वच सर्व जागा जिंकल्या होत्या. सुभाष देशमुख यांच्या पॅनेलला एकही जागा मिळालेली नव्हती. यावेळी मात्र त्यांनी ग्रामपंचायत मतदारसंघातील तीन जागा जिंकून बाजार समितीत एन्ट्री केली आहे.
आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे यांना सोबत घेऊन बाजार समितीची निवडणूक लढवली. भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी मात्र काँग्रेससोबतची युती मान्य नसल्याचे सांगून बाजार समितीसाठी स्वतंत्रपणे दंड थोपटले होते. सोसायटी मतदारसंघ हा दिलीप माने आणि सुरेश हसापुरे यांचा बालेकिल्ला मानला जातो, त्या बालेकिल्ल्याच्या जोरावरच ही जोडगळी आतापर्यंत बाजार समितीत बाजी मारत आली आहे. या वेळी पुन्हा तेच झाले आहे.
सहकारी संस्था मतदारसंघातून कल्याणशेट्टी, माने आणि हसापुरे यांच्या पॅनेलचे सर्वच सर्व ११ उमेदवार निवडून आले आहेत. त्यांनी विरोधकांना सरासरी एवढ्या ८०० मतांच्या फरकानी मात दिली आहे. सोसायटी मतदारसंघातून विरोधी सुभाष देशमुख यांच्या पॅनेलच्या उमदेवारांना तीन आकडी संख्याही गाठता आलेली नाही, त्यामुळे बाजार समितीला दंड थोपटणाऱ्या देशमुखांना सहकारी संस्था मतदारसंघातून मात देण्याची कला माने यांनी आत्मसात केलेली आहे.
सहकारी संस्था गटातील कल्याणशेट्टी, माने आणि हसापुरे यांच्या पॅनेलचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली पुढीलप्रमाणे :
सहकार संस्था सर्वसाधारण गट
दिलीप माने : १३६१
सुरेश हसापुरे : १३५५
राजशेखर शिवदारे :१३६६
श्रीशैल नरोळे : १२४४
उदय पाटील : १२८३
प्रथमेश पाटील : १२७१
नागप्पा बनसोडे : १२८०
सहकार संस्था महिला राखीव गट
इंदुमती अलगोंडा : १३२७
अनिता विभुते : १२८८
सहकार संस्था इतर मागास वर्ग
अविनाश मार्तंडे : १३४५
सहकार संस्था विमुक्त जाती-भटक्या जमाती
सुभाष पाटोळे : १२४३
ग्रामपंचायत गटातून सुभाष देशमुख यांच्या पॅनेलचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. त्यात देशमुखांचे चिरंजीव मनीष देशमुख २१६ मतांनी, रामप्पा चिवडशेट्टी १९५ मतांनी तर अतुल गायकवाड हे ७१ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे
ग्रामपंचायत मतदारसंघ (देशमुख पॅनेल)
मनीष देशमुख (636)
रामप्पा चिवडशेट्टी ( 615)
ग्रामपंचायत मतदारसंघ राखीव
अतुल गायकवाड (५८९)
कल्याणशेट्टी, माने, हसापुरे पॅनेल
सुनील शेळके ( ५७० )
कल्याणशेट्टी, माने हसापुरे पॅनेलचे सुनील शेळके हे ३४ मतांनी निवडून आले आहेत. त्यांना एकूण ५७० मते पडली आहेत. मात्र ग्रामपंचायत मतदारसंघातून संगमेश बगले (472 मते), तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांना (420 मते,) तर सुभाष देशमुख यांच्या पॅनेलचे यतीश शहा यांचा ३४ मतांनी पराभव झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.