Solapur Lok Sabha 2024 : फडणवीसांच्या परीक्षेत विजयकुमार देशमुख ‘पास’, तर सुभाष देशमुख ‘फेल’!

Subhash Deshmukh-Vijaykumar Deshmukh-Devendra Fadnavis : भाजपचे उमेदवार सातपुते यांना फक्त दोनच मतदार संघातून मताधिक्क्य मिळाले आहे. मिळालेले हे मताधिक्य गेल्या 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत कमीच आहे. पण आमदार प्रणिती शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या शहर मध्य मतदारसंघात भाजपने बरोबरीची लढत दिली आहे.
Vijaykumar Deshmukh-Devendra Fadnavis-Subhash Deshmukh
Vijaykumar Deshmukh-Devendra Fadnavis-Subhash Deshmukh

Solapur, 07 June : सोलापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे चार आमदार असूनही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राम सातपुते यांना अवघ्या दोन मतदारसंघातून मताधिक्य मिळाले आहे. या दोन्ही मतदारसंघात २०१९ च्या तुलनेत लिड घटले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परीक्षेत माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख ‘पास’, तर माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख ‘फेल’ झाले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील मताधिक्क्याचा विधानसभेच्या तिकिटासाठी निकष लावायचे म्हटले तर सुभाष देशमुखांचे काय, असा प्रश्न निर्माण होतो.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून (Solapur Lok Sabha Constituency) काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे या 74 हजार मतांच्या फरकांनी निवडून आल्या आहेत. त्यांना चार विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळाले असून भाजपचे उमेदवार सातपुते (Ram Satpute) यांना फक्त दोनच मतदार संघातून मताधिक्क्य मिळाले आहे. मिळालेले हे मताधिक्य गेल्या २०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत कमीच आहे. पण आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांचा मतदारसंघ असलेल्या शहर मध्य मतदारसंघात भाजपने बरोबरीची लढत दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सोलापुरातील दोन्ही देशमुख आणि सचिन कल्याणशेट्टी यांच्या खांद्यावर राम सातपुते यांना निवडून आणण्याची जबाबदारी देण्यात आली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘गुडबुक’मधील राम सातपुते यांना सोलापूरमधून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती, त्यामुळे फडणवीसांचे सोलापूरकडे बारीक लक्ष होते. दोन देशमुखांकडून उपमुख्यमंत्री फडणवीसांना मोठी अपेक्षा हेाती.

किमान मागील विधानसभेइतके मताधिक्क्य सातपुते यांना द्यावे, अशी सूचना फडणवीसांनी दोन देशमुख आणि कल्याणशेट्टींना केल्याची माहिती आहे. त्यात विजयकुमार देशमुख आणि सचिन कल्याणशेट्टी हे फडणवीसांच्या अपेक्षेला खरे उतरले आहेत. या दोघांनी आपापल्या मतदारसंघातून सातपुते यांना मताधिक्क्य दिले आहे. मात्र, दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख हे मताधिक्क्य देण्यात अपयशी ठरले आहेत. फडणवीसांच्या परीक्षेत सचिन कल्याणशेट्टी आणि विजयकुमार देशमुख हे दोघेच पास झाले आहेत, तर सुभाष देशमुख हे फेल ठरले आहेत.

Vijaykumar Deshmukh-Devendra Fadnavis-Subhash Deshmukh
Ajit Pawar-Supriya Sule :सुप्रिया सुळेंची मोठी घोषणा; अजितदादांची राजकीय इनिंग सुरू झालेल्या संस्थेत घातले लक्ष!

वास्तविक मागील लोकसभा निवडणुकीत सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट मतदारसंघातून मताधिक्य दिले होते. यामध्ये विजयकुमार देशमुख यांच्या शहर उत्तर मधून महास्वामी यांना सर्वाधिक 63 हजार 667 मतांचे लीड मिळाले होते, तर आमदार प्रणिती शिंदे यांच्या शहर मध्य मतदारसंघात 20 हजार 829 तर अक्कलकोटमधून 47 हजार 229, तर माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या दक्षिण सोलापूरमधून 37 हजार 778 मताधिक्य मिळाले होते.

माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या सोलापूर शहर उत्तर मतदार संघात राम सातपुते यांना एक लाख 7 हजार 381 मते मिळाली आहेत. प्रणिती शिंदे यांना ७१ हजार 454 मते मिळाली आहेत. देशमुख यांनी शहर उत्तर मतदारसंघातून सातपुते यांना 35 हजार 927 चे मताधिक्य दिले आहे. दक्षिण सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांना एक लाख 5 हजार 474 मते, तर राम सातपुते यांना 96 हजार 0३८ मते मिळाली आहेत. दक्षिण सोलापूरमधून 9436 चे मताधिक्क्य दिले आहे.

Vijaykumar Deshmukh-Devendra Fadnavis-Subhash Deshmukh
Ajit Pawar : वाह क्या बात है...! दिल्लीत अजितदादांना मानच मान!

विधानसभा निवडणुकीच्या तिकिट वाटपासाठी भाजपमध्ये लोकसभा निवडणुकीतील मताधिक्क्याचा निकष लावण्याची चर्चा सुरू आहे. तसा निकष लावल्यास सचिन कल्याणशेट्टी, विजयकुमार देशमुख हे पात्र ठरू शकतात. मात्र, सुभाष देशमुख यांच्या उमेदवारी काय, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मात्र, ही फक्त चर्चा आहे, त्याबाबत भाजपकडून कोणीही अधिकृतपणे बोललेले नाही.

Vijaykumar Deshmukh-Devendra Fadnavis-Subhash Deshmukh
Ramtek's Defeat Effect : रामटेकचा पराभव भाजपच्या जिव्हारी; एका आमदाराचे तिकिट कापणार, दुसऱ्याची मंत्रिपदाची संधी हुकणार!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com