Manohar Bhosale  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Manohar Bhosale : पोलिसांनी ताब्यात घेताच मनोहर भोसलेचा बीपी वाढला; रिपोर्ट नॉर्मल येताच पुन्हा ठाण्यात रवानगी, घोटी आश्रमाबाहेर मोठा बंदोबस्त

Karmala News : व्यावसायिकाची फसवणूक प्रकरणी मनोहर भोसलेला अटक करण्यात आली. अटकेनंतर बीपी वाढल्याने रुग्णालयात दाखल केले, मात्र तपासणीनंतर अहवाल नॉर्मल आल्याने पुन्हा पोलिस ताब्यात देण्यात आले.

सरकारनामा ब्यूरो

Solapur, 25 April : व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर भोसले ऊर्फ मनोहरमामा याला शुक्रवारी रात्री कुर्डूवाडी पोलिसांनी पुण्याच्या मांजरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर रात्री अकराच्या सुमारास मनोहर भोसलेचा बीपी अचानक वाढला, त्यामुळे त्याला तातडीने कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन तासांचे वैद्यकीय उपचार आणि तपासण्या करण्यात आल्यानंतर त्यात मनोहर भोसलेचा रिपोर्ट नॉर्मल आला, त्यानंतर त्याला पुन्हा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

दरम्यान, २०२१ मध्ये अटक झाल्यानंतर उंदरगाव येथील मठ बंद करून मनोहर भोसले याने करमाळा (Karmala) तालुक्यातील घोटी येथे तब्बल २२ एकर क्षेत्रावर सुसज्ज आश्रम उभारला आहे. त्या ठिकाणी अनेक राजकीय नेते, उच्चस्पद अधिकारी आणि बड्या आसमींचा राबता असायचा. भोसले याला अटक केल्यानंतर घोटीतील आश्रमबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बाहेरून कोणालाही आश्रमात सोडले जात नाही, तसेच आतील लोकांना बाहेर सोडले जात नसल्याचे सांगण्यात येत आहे.

अडचणीत सापडलेल्या सोलापुरातील व्यावसायिकाल पूजा करावी लागेल, असे सांगून त्यासाठी दोन लाखांची मागणी मनोहर भोसले (Manohar Bhosale) याच्याकडून करण्यात आली होती. पूजेसाठी पन्नास हजार रुपये दिले, मात्र पुढे काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने व्यावसायिक गौतम कसबे यांनी कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

कसबे यांच्या फिर्यादीवरून मनोहर भोसले आणि त्याचा साथीदार विशाल वाघमारे या दोघांना कुर्डूवाडी पोलिसांच्या पथकाने मांजरी येथून ताब्यात घेतले होते. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मनोहरमामाचा रात्री अकराच्या सुमारास अचानक बीपी वाढला. त्यामुळे पोलिसांनी त्याला तातडीने कुर्डूवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मनोहर भोसले याला कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक सुनंदा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गोळ्या औषधे देण्यात आली. त्यानंतर त्याला रुग्णालयातच दोन तास डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले. दोन तासांनंतर त्याच्या तपासण्यात करण्यात आल्या, त्यात त्याचा ईसीजी आणि बीचीचा रिपोर्ट नॉर्मल आला, त्यामुळे मनोहरमामाला पुन्हा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

दरम्यान, मनोहर भोसले आणि त्याचा साथीदार विशाल वाघमारे यांना शनिवारी माढा न्यायालयात उभे करण्यात आले. न्यायालयाने तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मनोहर भोसले याला पाहण्यासाठी कुर्डूवाडी पोलिस ठाण्याच्या बाहेर मोठी गर्दी झाली होती. मात्र, पोलिसांनी त्यांना वारंवार पांगवले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT