Solapur : आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक होताना दिसत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली मुदत उद्या (ता. २४ ऑक्टोबर) संपत आहे. बारामतीत आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मराठा युवकांनी आरक्षण प्रश्नावरून घेराव घालण्याचा प्रयत्न केला, तर माढ्यातील सभेत काळे झेंडे दाखविले. (Maratha reservation: Ajit Pawar surrounded in Baramati, black flags shown in Madha)
मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला महिनाभराची मुदत दिली होती. ती मुदत संपत येत असतानाच समाजातील काही तरुणांनी टोकाचे पाऊल उचलेले आहे. काही तरुण आक्रमक होऊन आमदार, मंत्र्यांना जाब विचारत आहेत. बारामतीच्या दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काही तरुणांनी घेराव घालण्याचा प्रयत्न केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
बारामती तालुक्यातील पणदरे येथे अजित पवार यांच्या हस्ते माळेगाव साखर कारखान्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष केशवराव जगताप, उपाध्यक्ष तानाजी देवकाते यांचा सत्कार करण्यात आला. त्या कार्यक्रमानंतर विनोद जगताप आणि इतर तरुणांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर अजित पवार यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तुमची भूमिका काय आहे, असा सवाल त्यांनी केला. त्यावेळी कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आहे. विविध घटकांबरोबर बैठका घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यासंदर्भात चर्चा करत आहेत. मराठा समाजातील काही लोक ‘ईडब्लूएस’चा लाभ घेत आहेत, असेही पवारांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज माढ्याच्या दौऱ्यावर आले होते. विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाची सुरुवात पवार यांच्या हस्ते करण्यात आली. त्या कार्यक्रमात एका तरुणाने एक मराठा...लाख मराठा अशा घोषणा देत खिशातील काळे झेंडे सभेत फडकावले. पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले. मात्र, बारामतीनंतर माढ्यातही पवारांना मराठा आरक्षणावरून तरुणांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.