Mumbai News : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून आतापर्यंत राज्यातील तीन तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला एक महिन्याची मुदत देऊन उपोषण मागे घेतले आहे. पण, गेल्या महिनाभरात सरकारने काय केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणात अपयशी ठरले आहेत. अजित पवार हे तर प्रश्न विचारल्यानंतर पळून जात आहेत. मराठा आरक्षणप्रश्नी सरकारला आणखी किती बळी हवेत आहेत, असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला. (Govt wants more victims on Maratha reservation issue: Sanjay Raut)
संजय राऊत म्हणाले की, मनोज जरांगे पाटील हे सध्या राज्यात ठिकठिकाणी जाऊन मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून जनजागृती करीत आहेत. पण सरकार काय करतंय, एक महिन्यात सरकारने काय केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अंतरवाली सराटीत उपोषण सोडवायला गेले होते. त्यावेळी त्यांनी महिनाभरात मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. आता ते टिकणारे मराठा आरक्षण देणार, असे सांगत आहेत. पण त्यासाठी मुख्यंत्र्यांना किती दिवस लागणार.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
काही मंत्री राज्यातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. दिवाळीपूर्वी सरकारला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का. छगन भुजबळ यांची वेगळी दिशा आहे. शिंदे गटातील काही नेते भडकावू विधानं करीत आहेत. सरकारमध्ये बसलेले काही लोकांनी कुणबी दाखले घेण्यास विरोध केला आहे. त्यामुळे राज्यात एक कन्फ्यूजन निर्माण झाले आहे, असेही ते म्हणाले.
ते म्हणाले की, मराठा समाजाला सरकारला आरक्षण द्यायचे आहे की नाही, हे स्वतःला मराठा समजणारे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी समोर येऊन सांगावे. गेल्या महिनाभरात तीन मराठा युवकांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकारच्या डोळ्याची पापणीही हलली नाही. मग सरकार कशासाठी आहे. मराठा मतांसाठी भाजपनं तुम्हाला मुख्यमंत्रिपदी बसवले आहे ना. मग आपण काय करता. ते लोण आणखी पसरण्याची भीती आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून दुर्दैवाने चौथी आत्महत्या झाली तर मराठा समाजाच्या नेत्यांनी आणि संघटनांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे.
मुख्यमंत्री हे भाजप आणि बिल्डरला दिलेला शब्द पाळतात. मुळात त्यांच्या हातात काही नाही. या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील यांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यावी. कायद्यात दुरुस्ती करावी. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून होणाऱ्या आत्महत्या आम्हाला पाहावत नाहीत, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.