Gunratna Sadavarte Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gunratna Sadavarte : सदावर्तेंनी नव्या वादास तोंड फोडले; " शरद पवार, ठाकरेंनी मराठा आरक्षणाचा..."

Maratha Reservation : मराठा समाजाने मागासवर्गीय बनण्याच्या फंदात पडू नये...

Mangesh Mahale

Mumbai : मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असतानाच गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा मराठा समाजाबाबत वादग्रस्त विधान केले आहे. "जोर जबरदस्तीने आरक्षण मिळवता येत नाही. मराठा समाजाने मागासवर्गीय बनण्याच्या फंदात पडू नये," असे सदावर्ते म्हणाले. "मराठा आरक्षणाचा वाद शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी उभा केला," असा गंभीर आरोप त्यांनी केला. या आरोपामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

"मराठा समाजातील बांधवांनी मोठं मोठ्या पदावर जावं पण मागासवर्गीय होऊन जाण्याच्या शोधण्याच्या भानगडीत पडू नये.आगामी काळात मराठा समाज बांधवाना कळेल की आरक्षणाच्या विषयावरून राजकारणी लोक आपली पोळी भाजत आहेत. मराठा समाज आरक्षणात बसत नाही. मराठा आरक्षणाचा वाद उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पावर यांनी हा वाद उभा केला आहे," असे सदावर्ते म्हणाले. ते वसईमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा आरक्षणाला विरोध करणारे अँड गुणरत्न सदावर्ते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप काही जणांनी केला आहे. त्याला फडणवीसांनी उत्तर दिले आहे. "सदावर्ते यांच्याशी माझा काहीही संबध नाही, तो कुणाच माणूस आहे, हे सर्वांना ठाऊक," असे फडणवीस म्हणाले.

राज्यात सध्या सुरू असलेल्य मराठा आरक्षणाला व मनोज जरांगे पाटलांवर गंभीर टीका करणाऱ्या सदावर्तेंच्या गाडीवर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. पोलिसांसमोर त्यांच्या दोन गाड्या आंदोलकांनी फोडल्या. सदावर्ते हा फडणवीसांना माणूस असल्याची टीका केली जात आहे. त्यावर फडणवीसांनी एका मुलाखतीत स्पष्टीकरण दिले आहे.

"कुठल्याही हिसेंचं समर्थन केले जाणार नाही. पण सदावर्ते यांनी सुध्दा ही गोष्ट लक्षात ठेवायची हवी की एखाद्या समजाच्या विरोधात किती बोलावं," असा सवाल फडणवीसांनी केला. " सदावर्ते यांची भूमिका सातत्याने बदलत असते. व्यक्तिगत जीवनात मी त्यांना फक्त दोनदा भेटलो. माझा सदावर्ते यांच्याशी काहीही संबध नाही, तो कुणाच माणूस आहे, हे सर्वांना ठाऊक आहे," असे सांगत फडणवीसांचा रोख कुणाकडे आहे, याची चर्चा सध्या सुरु आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT