Nagar News : शिक्षक अधिवेशनात घुसले मराठा आंदोलक; केसरकरांनी धसका घेत दौरा केला रद्द

Maratha Reservation : अधिवेशनाला मंत्री आले नसले तरी शिक्षक नेत्यांनी कार्यक्रम सुरू केला होता.
Maratha Reservation, Nagar News
Maratha Reservation, Nagar News Sarkarnama
Published on
Updated on

प्रदीप पेंढारे

Nagar : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ यांचे राज्यस्तरीय महामंडळ सभा आणि नगर जिल्हा त्रैवार्षिक अधिवेशन नगरमध्ये आज (रविवारी) होत आहे. या अधिवेशनाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे येणार आहेत. राजकीय नेते येणार असल्याची माहिती मिळताच या अधिवेशनामध्ये मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाचे पदाधिकारी घुसले. जोरदार घोषणाबाजी करत व्यासपीठाचा ताबा घेतला. यामुळे गोंधळ उडाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पोलिसांनीही व्यासपीठाकडे धाव घेतली. व्यासपीठामागील फलक उतरवल्यानंतर मराठा समाजाचे पदाधिकारी शांत झाले. दरम्यान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नगर दौरा रद्द केल्याची माहिती 'सरकारनामा'ला दिली. याचबरोबर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनीही अधिवेशनाला हजेरी लावली नाही.

Maratha Reservation, Nagar News
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी पठ्ठ्यानं रेखाटलं स्वतःच्या रक्तानं जरांगेंचं चित्र!

आंदोलकांनी घेतला व्यासपीठाचा ताबा ...

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ यांचे राज्यस्तरीय महामंडळ सभा नगरमध्ये होत आहे. अधिवेशनाला राज्यातले तीन मंत्री येणार होते. अधिवेशनाची जोरदार तयारी करण्यात आली होती. परंतु राज्यात मराठा आरक्षणावरून आंदोलन पेटले आहे. आंदोलन आक्रमक आहेत. त्यामुळे या अधिवेशनावर मराठा आरक्षण मराठा आंदोलकांचे काय पडसाद उमटतात याकडेही लक्ष लागले होते.

अधिवेशनाला मंत्री आले नसले तरी शिक्षक नेत्यांनी कार्यक्रम सुरू केला होता. काही जण आपले अनुभव मांडत होते. तेवढ्यात मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाचे पदाधिकारी अधिवेशनात घुसले. 'एक मराठा लाख मराठा', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती. मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आणि आंदोलकांनी व्यासपीठावर ताबा घेतला. त्यामुळे व्यासपीठावर एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी व्यासपीठाच्या दिशेने धाव घेतली.

शिक्षक नेत्यांची समंजस भूमिका...

व्यासपीठावर असलेले शिक्षक नेते हे देखील आंदोलकांना भिडले. आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचे सांगत होते. मराठा आंदोलन हे आक्रमक होते. व्यासपीठावरील फलक काढून टाका, अशी मागणी करत होते. हे मंत्री काहीच कामाचे नाही, असे सुनावत होते. शेवटी काही आंदोलकांनी फलकाकडे धाव घेतली. फलक ओढायला सुरुवात केली.

पोलिसांनी त्यांना रोखले. परंतु शिक्षक नेत्यांनी समंजस भूमिका घेतली. फलक काढून टाकत आहोत, असे आंदोलकांना सांगितले. यानंतर आंदोलकांनी मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा द्या, अशी मागणी केली. तरच अधिवेशन पुढे चालू ठेवा, असे सुनावले. यावर व्यासपीठावरील शिक्षक नेत्यांनी मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले. यानंतर आंदोलक शांत होत घोषणाबाजी करत मागे फिरले. अधिवेशनाच्या व्यासपीठावरील फलक देखील यावेळी उतरवण्यात आला.

Maratha Reservation, Nagar News
Devendra Fadnavis : सदावर्ते कुणाचा माणूस? हे सर्वांना ठाऊक; फडणवीसांचा रोख कुणाकडे?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com