Nagar News : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)यांच्यावर जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी करीत असताना झालेल्या अपघातातील जखमी तरुणाचा मृत्यू झाला आहे. गोकुळ कदम याच्या निधनाने मराठा समाजात हळहळ व्यक्त केली जात आहे. अन्य तीन जणांवर येवल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
येवला शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर मनोज जरांगे यांची नऊ ऑक्टोबरला जाहीर सभा होती. जरांगे यांचे आगमन झाल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर जेसीबीच्या साह्याने पुष्प उधळण करण्यात येत होती.
यादरम्यान गर्दी झाल्याने जेसीबीच्या ऑपरेटरला अज्ञात व्यक्तीचा धक्का लागला. त्यामुळे जेसीबी मशीनच्या समोरील बकेट खाली झुकली. त्यामुळे बकेटमधून फुले उधळणारे युवक खाली कोसळले होते.
यात चौघेजण गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, यातील गोकुळ रावसाहेब कदम या युवकाचा मृत्यू झाला आहे. त्याच्यावर २५ दिवसांपासून कोपरगाव येथे उपचार सुरू होते. मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी सरकारला दोन महिन्यांची मुदत दिली आहे.
वेळ घ्या पण आरक्षण द्या, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं आहे. मात्र, आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार हेदेखील त्यांनी जाहीर केलं आहे. एक डिसेंबरपासून साखळी उपोषण सुरू होणार असल्याचे जरांगेंनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.